Monday, March 2, 2026
Home मराठी प्रेमात लागलेल्या प्रत्येकासाठी तेजस्विनी पंडितचा ‘बांबू’, केला नवीन इनिंगचा श्रीगणेशा

प्रेमात लागलेल्या प्रत्येकासाठी तेजस्विनी पंडितचा ‘बांबू’, केला नवीन इनिंगचा श्रीगणेशा

पूर्वी कलाकार फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे. अभिनय एके अभिनय असे करत चालणारे अनेक कलाकार आपण पाहिले असतील. मात्र जसा काळ बदलला तसे सर्वच बदलले आणि पूर्वी फक्त अभिनय करणारे कलाकार आता विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय होताना दिसू लागले. आज जर आपण मनोरंजविश्वात नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की असे अनेक कलाकार आहेत जे निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. याशिवाय सिनेसृष्टीसोडून दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारे देखील अनेक कलाकार आहेत.

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय सुंदर आणि आकर्षक अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडिती देखील लवकरच तिच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसिरीज आदी मनोरंजनाची सर्वच माध्यमं गाजवणारी तेजस्विनी लवकरच निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तेजस्विनीने तिच्या या नव्या पदार्पणाबद्दल माहिती दिली आहे. तिने तिची निर्मिती असलेल्या ‘बांबू’ या सिनेमाचा टिझर पोस्ट केला.

या टीझरसोबत तेजस्विनीने लिहिले, “Creative Viibe ची पहिली चित्रपट निर्मिती ” बांबू ” याचा आज मुहूर्त करतो आहोत, तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद पाठीशी असुदे. प्रेमात पडलेल्या, नव्हे प्रेमात लागलेल्या प्रत्येकासाठी ‘बांबू’
एक युथ एंटरटेनिंग, खुमासदार कथानक” या सिनेमाचा टिझर खूपच आकर्षक आणि उत्सुकता वाढवणारा असून, तिच्या या सानमसोबत अनेक मोठी नावे जोडलेली आहेत. त्यामुळे आतापासूनच या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. या सिनेमाबद्दल अधिक माहिती लवकरच समोर येईल. तत्पूर्वी तेजस्विनीने या सिनेमा आधी ‘अथांग’ या वेबशोची निर्मिती केली होती.

तेजस्विनीबद्दल सांगायचे झाले तर मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय, ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा म्हणून तिची आहे. ,इ सिंधूताई सपकाळ, ये रे ये रे पैसा, १०० डेज, समांतर आदी अनेक कलाकृतींमधून तिने तिच्यातल्या ताकदवान अभिनेत्रीला सिद्ध केले. याशिवाय ती अभिनेत्री अभिज्ञा भावेसोबत ‘तेजाज्ञा’ नावाचा साड्यांचा ब्रँड देखील चालवते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा