Saturday, July 6, 2024

भारीच ना! ‘बबड्या’ अन् ‘शुभ्रा’ची जोडी ‘या’ प्रोजेक्टमधून पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी या वाहिनीवरील अनेक मालिका प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु यावर्षी त्यातील एक मालिका चांगलीच गाजली होती. ती मालिका म्हणजे ‘अगंबाई सासूबाई’ होय. या मालिकेमध्ये निवेदिता सराफ, गिरीश ओक, मोहन जोशी, तेजश्री पंडित आणि आशुतोष पत्की हे कलाकार होते. या सगळ्यांनी एक नवीन विषय प्रेक्षकांसमोर मांडला होता. यातून अनेक ठिकाणी जागरूकता देखील निर्माण झाली होती. या मालिकेतील शुभ्रा आणि सोहम म्हणजेच बबड्या हे पात्र चांगलेच गाजले होते. ही पात्रं तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांनी निभावली होती. त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती, पण ‘अगंबाई सुनबाई’ या मालिकेत मात्र हे दोन्हीही कलाकार नाहीयेत. ही जोडी आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. ती म्हणजे तेजश्री आणि आशुतोष लवकरच त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तेजश्री प्रधानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर त्यांच्या आगामी नाटकाचे पोस्टर शेअर करून ही माहिती दिली आहे. हा पोस्टर शेअर करून तिने लिहिले आहे की, “हे रसिक प्रेक्षका! माझ्या सारखीच तुमचीही अच्छा असेल की, लवकरच आपली नाट्यगृह पुन्हा सुरु व्हावीत. आम्ही छान काहीतरी कलाकृती करायला आणि तुम्ही ती पाहायला जवळच्या नाट्यगृहात यावं. पण तोपर्यंत एका वेगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आमची कला सादर करत आहोत. चूकभूल द्यावी घ्यावी. ‘नाट्यमंच’ या डिजिटल माध्यमातून नाटकांना जीवनात ठेवण्यासाठी तुमचे खूप आभार.”

https://www.instagram.com/p/CStAtS1K6Z1/?utm_source=ig_web_copy_link

तेजश्री आणि आशुतोषच्या आगामी नाटकाचे नाव ‘साटंलोटं’ हे आहे. या नाटकाचे लेखक रत्नाकर मतकरी हे आहेत. तसेच विजय केंकरे हे दिग्दर्शक आहेत. या नाटकात स्वाती चिटणीस, अजित भुरे, विनिता दाते, आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधान हे कलाकार असणार आहेत. आशुतोष आणि तेजश्रीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. (tejshri pradhan share her upcoming project poster on social media)

तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचे बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते.

याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

हे देखील वाचा