Wednesday, June 26, 2024

अल्लू अर्जुन अडकला अडचणीत, अपमानकारक जाहिरातीमुळे तेलंगणा सरकार पाठवणार नोटीस

तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने नुकतेच दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या एका जाहिरातीला विरोध केला आहे. ही जाहिरात बाईक टॅक्स ऍपची आहे. जी नुकतेच यूट्यूबवर आली आहे. या जाहिरातीत अल्लू अर्जुन म्हणतो की, “राज्यामध्ये तुम्हाला वाहतूक करण्यासाठी बसने खूप वेळ लागतो. या ऍपद्वारे तुम्ही लवकर आणि सुरक्षित हव्या त्या ठिकाणी पोहचू शकता.”

एका डोसा विकणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारून अल्लू अर्जुन गिऱ्हाईकला गर्दीत बसमध्ये जाण्याऐवजी बाईकने जा असे सांगतो. या जाहिरातीत अल्लू अर्जुन आंध्रप्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एक गाव विरवसरमच्या मार्गाकडे इशारा करत बोलत असतो. (Telengana RTC to sent legal notice to allu arjun for his advertisement)

टीएसआरटीसीच्या मॅनेजिंग डायरेक्टर वी.सी. सज्जनरने सांगितले की, या जाहिरातीला काही प्रेक्षकांनी विरोध दर्शवला आहे. ज्यामध्ये आरटीसीमध्ये जाणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, “टीएसआरटीसी सामान्य माणसांच्या सोयीसाठी आहे आणि यासाठीच अल्लू अर्जुन अशा जाहिरातींना प्रमोट केल्यामुळे त्याला नोटीस पाठवली जाईल. अल्लू अर्जुनला त्या जाहिरातींना प्रमोट केले पाहिजे ज्या नागरिकांना सहजेतेने प्राप्त होईल.”

सज्जनर या आधी साइबराबाद पोलीस अधिकारी होते. त्यानंतर ते टीएसआरचे एमडी झाले. त्यांचे देखील अभिनेत्याला हेच म्हणणे आहे की, त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट विरोधात नाही बोलले पाहिजे.

अल्लू अर्जुनच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तो लवकर ‘पुष्पा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार हे आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मीका मंदाना मुख्य भूमिकेत असणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्यांना एकत्र चित्रपटात बघण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा