Monday, July 1, 2024

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या’ अभिनेत्रीने 32 व्या वर्षी एग्स फ्रीज करत घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या यामागचे कारण

‘बहू हमारी रजनीकांत’ मालिकेतून छाप पाडणारी अभिनेत्री रिद्धिमा पंडित ही घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे तिचे कौतुक केले गेले. तसेच तिने बिग बॉस या शोमध्ये देखील धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ती चर्चेत असायची, पण आता मात्र ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रिधिमा हीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री रिधिमा (Ridhima Pandit) ही 32 वर्षांची असून, तीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिचे एग्स फ्रीज केले होते. याविषयी बोलताना तिने तिला तिच्या निर्णयाचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. तसेच ती म्हणते की, ‘आता तिला तिच्या आयुष्यात पूर्वीपेक्षा जास्त स्वतंत्र वाटत आहे.’ पण तिने असा निर्णय का घेतला याचाही तिने खुलासा केला. असाच काहीसा निर्णय ‘3 इडियट्स फेम’ ‘अभिनेत्री मोना सिंग’ हिने 34 व्या वर्षी घेतला होता.

याविषयी बोलताना रिधिमा म्हणाली, गेल्या वर्षी हा निर्णय घेतला होता. मी या गोष्टीचा विचार करत होते. मी सप्टेंबर 2022 मध्ये एग्स फ्रीज केले. मी एक प्रोजेक्ट करत असताना मला एक महिन्याचा वेळ होता. त्या दरम्यान मी ही प्रकिया पूर्ण केली. या प्रक्रियेसाठी मी उत्तम डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतलं.

पण सर्व निर्णयात मला माझ्या कुटुंबियाचा खुप पाठींबा मिळाला. विशेष म्हणजे तिच्या दिवंगत आईने तिला या साठी पाठींबा दिला होता. ती पुढे म्हणते की, माझे कुटुंबीय खुप आधुनिक विचारांचे आहेत. याबाबतीत मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा देखील केली. उद्या मला लग्न करावेसे वाटले नाही किंवा चांगला मुलगा मिळाला नाही. जर मी करिअर वर फोकस करण्याचे ठरवले पण मला आई होण्याची इच्छा झाली तर मी याचे नियोजन आधीच करत आहे. अस मी आईला म्हणाले. यावर आई मला सल्ला देत म्हणाली की नक्की विचार कर.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ridhima Pandit (@ridhimapandit)

अनेक लोकांना यातून प्रेरणा मिळू शकते. रिद्धिमा म्हणते की, ‘स्त्री मातृत्व आणि काम कसे सांभाळेल या प्रश्नांनी नेहमीच वेढले जाते, परंतु पुरुषाला याबद्दल कोणी विचारत नाही. लोक त्यांच्या व्यवसायाची पर्वा न करता महत्वाकांक्षी असतात, म्हणून त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि लग्न आणि मातृत्वाचा निर्णय पुढे ढकलल्याबद्दल अभिनेत्रींना दोष देऊ नका.

अभिनेत्री म्हणते की तिने जरी हा एग्स फ्रीज केले असतील, पण याचा अर्थ असा नाही की, तिला लग्न करायचं नाही. ती म्हणते, ‘मला अजून कोणीही जोडीदार सापडलेला नाही. महिलांसाठी आई होण्याचा एक विशिष्ट वय असतं, त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे. आता मला लग्न करण्याचाही ताण असणार नाही. या सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या व्हाव्या, असं मला वाटतं. पण तसं नाही झालं, हे भविष्यासाठी केलेले नियोजन केले आहे. भविष्यात मला खंत वाटणार नाही’ अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. (television-32-years-old-actress-radhima-pandit-freeze-her-eggs)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’ फेम ‘शैलेश लोढा’ यांनी एक पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘अब जंग तो होगी…’
काम मिळवण्यासाठी ‘गंगुबाई काठियावाडी’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा 40 वर्षे संघर्ष, सावळा रंग ठरले कारण

हे देखील वाचा