Wednesday, July 3, 2024

‘शोमध्ये प्रतिभेपेक्षा गरिबी दाखवतात’, म्हणत ‘इंडियन आयडल १२’ शोवर संतापला प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत

‘इंडियन आयडल १२’ हा रियॅलिटी शो सध्या खूप चर्चेत आहे. शोचे स्पर्धक त्यांच्या आवाजाच्या जादूने परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. त्याचवेळी शोचे निर्माते टीआरपीसाठी असे काहीतरी करतात की, ज्यामुळे त्यांना प्रेक्षकांच्या रागाचा सामना करावा लागतो. नुकतेच किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यानंतर हा शो बर्‍याच वादात सापडला आहे. शो प्रसारित झाल्यानंतर अमित यांनी अनेक खुलासे केले होते, आणि सांगितले की हा भाग आपल्याला अजिबात आवडला नाही. अमित कुमार यांच्या वक्तव्यानंतर शोचा होस्ट आणि उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण यानेही यावर प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, शोच्या पहिल्या हंगामाचा विजेता अभिजीत सावंतनेही अनेक आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. यामुळे तो आता चर्चेत आला आहे.

अभिजीतने एका मुलाखती दरम्यान शोशी संबंधित काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तो म्हणाला, “हल्ली रियॅलिटी शोचे निर्माते एखाद्या स्पर्धकाच्या प्रतिभेपेक्षा तो किती गरीब आहे यावर जास्त लक्ष देतात.” एवढेच नव्हे तर, अभिजीत सावंत पुढे म्हणाला, “तुम्ही जर स्थानिक रियॅलिटी शो बघितला, तर प्रेक्षकांना स्पर्धकांच्या पार्श्वभूमीबद्दल फार माहिती नसेल. तिथे लोक फक्त गाण्याकडेच लक्ष देतात, पण हिंदी रियॅलिटी शोमध्ये सहभागींच्या दुःखद कथा अधिक सांगितल्या जातात.”

याशिवाय अभिजीतनेही या शोमध्ये, लव्ह एँगलसारख्या गोष्टी दाखवल्या गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्वज्ञात आहे की, शोमध्ये अरुणिता कांजिलाल आणि पवनदीप राजन यांच्यातील केमिस्ट्री बऱ्याच काळापासून दाखविली जात आहे. गेल्या शोच्या मागच्या हंगामामध्ये नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्यात एक लव्ह एँगल दाखवण्यात आला होता. जेव्हा दोघांनी बनावट लग्नाचे नाटक केले होते, तेव्हा ते खूपच झाले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून अमित कुमार यांचे विधान समोर आल्यानंतर अनेक विधाने समोर आली आहेत, ज्यात आदित्य नारायण अनेकदा या कार्यक्रमाचा बचाव करताना दिसला आहे. अमित कुमार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ते म्हणाले की, “हो मला माहित आहे की, लोकांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खरं म्हणजे किशोर कुमारांसारखे कोणीही गाऊ शकत नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व डोंगराइतके उंच होते. आजच्या तरुण पिढीला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यांना फक्त ‘रूप तेरा मस्ताना’ आणि ‘आराधना’बद्दल माहिती आहे.”

विशेष म्हणजे अमित कुमार यांच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. ते म्हणाले होते, “मला सांगितलेल्या गोष्टी मी केल्या. मला प्रत्येकाचे कौतुक करण्यास सांगितले गेले. किशोर दा यांना श्रद्धांजली म्हणून, मला त्यांचे प्रमोशन करण्यास सांगितले गेले आहे. मला वाटले की, ही माझ्या वडिलांना श्रद्धांजली असेल. मी तिथे गेलो, मी जे मला सांगितले होते तेच केले. मी त्यांना सांगितले की, पटकथेचा थोडा भाग मला आधी द्या, पण असं काही घडलं नाही.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मदत केलीये ती बोंबलून सांगणं मला तरी पटत नाही’, कोरोना काळात मदत कर म्हणणाऱ्या युजरला सोनालीने शिकवला धडा

-अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या सुखी संसाराला ३७ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर पडला शुभेच्छांचा पाऊस!

-‘तुमच्या सारख्या माणसांनी या दुनियेला खरंच सुंदर आणि शांतीपूर्ण बनवलंय’, सोनू सूदने केली सीएसकेच्या ‘या’ खेळाडूची प्रशंसा

हे देखील वाचा