Sunday, October 1, 2023

मोठी बातमी टीव्ही अभिनेत्याने एका व्यक्तीवर झाडली गोळी, अभिनेता पोलिसांच्या ताब्यात

हैद्राबादमधून एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. इथे एका टीव्ही अभिनेत्याने एका व्यक्तीवर गोळी झाडली आहे. घरगुती वादामधून त्या अभिनेत्याने हे कृत्य केले आहे. सदर पीडित व्यक्तीने याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस तपास करत आहे. या प्रकरणाबद्दल अधिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाला दिली आहे.

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्याने एयरगनमधून एका व्यक्तीवर गोळी झाडली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ती एयरगन आणि अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित व्यक्ती विशाखापट्टणम येथे एका कंपनीमध्ये कार्यरत असून, तो २०१९ साली त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला होता. त्याची पत्नी तिच्या दोन मुलांसोबत अभिनेत्यासोबत राहत होती. पीडित व्यक्तीला त्याची मुलगी त्याच्यासोबत घेऊन जायचे होते. म्हणून तो अभिनेत्याच्या घरी गेला होता.

पुढे मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीमध्ये आणि अभिनेत्यामध्ये जोरदार भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की, अभिनेत्याने त्या व्यक्तीवर थेट गोळी झाडली. मात्र या थरारक घटनेत कोणीच जखमी झाले नाही. पोलिसांनी सांगितले की, त्या महिलेने तिच्या पहिल्या नवऱ्यावर तिला धमकवण्याचा आरोप लावला आहे. या आरोपामुळेच हे भांडण झाले आणि गोळी झाडण्यात आली. दरम्यान त्या अभिनेत्याबद्दल हे देखील समजत आहे की, तो एक सॉफ्टवेयर कंपनी देखील चावलतो. त्याच्या सॉफ्टवेयर कंपनीमध्ये एक महिला त्याची भागीदार आहे. मात्र याबाबत सध्या कोणतीही पुष्टी झालेली नाही.

हे देखील वाचा