Saturday, June 29, 2024

चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

देशात तौक्ते चक्रीवादळाने भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. मुंबई, गुजरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळ आणि पाऊस चालू आहे. या वादळाचा फटका सर्वांना बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याची बातमी समोर आली आहे. अशातच टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंग हिच्या घरापुढे एक मोठे झाड पडले आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे. हे झाड पडल्यावर दीपिकाने या झाडासोबत फोटो काढण्याची संधी सोडली नाही. तसेच तिने या झाडासोबत एक व्हिडिओ देखील शूट केला आहे.

टीव्हीवरील ‘दिया ओर बाती हम’ आणि ‘कवच’ मालिकेतील अभिनेत्री दीपिकाने या झाडासोबत फोटो पोस्ट करून लिहिले आहे की, “तुम्ही या वादळाला थांबवू शकत नाही, त्यामुळे हे असे करण्याचा प्रयत्न देखील करू नका. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला शांत ठेवू शकता. निसर्गाच्या या उदास आणि नाराज अंदाजाला मिठी मारू शकता. हे वादळ लवकरच निघून जाईल. हे झाड माझ्या घरासमोर पडले आहे. पण त्यामुळे कोणाला काही इजा झालेली नाहीये. परंतु या झाडाला बाजूला करण्या आधी मी आणि रोहितने या झाडासोबत फोटो काढून काही आठवणी तयार केल्या आहेत.”

दीपिकाने या झाडासोबत काही फोटो काढले आहेत. तसेच पावसात भिजताना एक रोमँटिक व्हिडिओ देखील शूट केला आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.

तिला सगळेजण या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत, तर काहीजण तिला ट्रोल देखील करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे रेकाॅर्डवरुन काढून टाका अध्यक्ष महोदय’, पाहा अभिनेत्री राजेश्वरी खरातने कुणाला केलीय विनंती

-जन्नत झुबेर रहमानीचा डान्स व्हिडिओ व्हायरल; पण अभिनेत्रीच्या आईनेच वेधले नेटकऱ्यांचे लक्ष!

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

हे देखील वाचा