टीव्ही अभिनेत्री कांची सिंगने अगदी कमी कालावधीत आपले नाव कमावले आहे. तिने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर बघता बघता तिला अनेक मालिकांसाठी अनेक ऑफर्स येऊ लागल्या. कांचीची गणना सगळ्यात सुंदर, लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये होते. अभिनयाच्या जोरावर तिने सगळ्यांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. तिच्या करिअरबाबत ती जेवढी चर्चेत आहे तेवढीच तिचा वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे. कांची ही ऑनस्क्रीनवर तिच्या भावाचे पात्र निभावणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. जाणून घेऊया तिच्या बाबतीत काही खास गोष्टी…
सन 2001 मध्ये ती ‘कुटुंब’ या मालिकेत बालकलाकार म्हणून दिसली होती. यामध्ये तिच्या अभिनयाला खूपच पसंती मिळाली. तिला पुढच्या मालिकेत काम देखील मिळाले. यानंतर कांचीने ‘ससुराल सिमर का’ या लोकप्रिय मालिकेत काम केले.
सन 2014 मध्ये ‘और प्यार हो गया’ या लोकप्रिय मालिकेतून कांची घराघरात पोहोचली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांची त्यावेळी केवळ 16 वर्षांची होती, जेव्हा तिने एका सूनेचं पात्र निभावलं. तिच्या या पात्राला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले होते. तिच्या भोळ्या स्वभावाने आणि अभिनयाने तिने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती.
कांची आणि राहुल नेहमी सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाचा खुलासा करताना दिसतात. एवढंच नाही तर त्या दोघांना क्यूट कपल म्हटले जाते. परंतु एकमेकांसोबत 5 वर्षाच्या रिलेशननंतर त्यांनी ब्रेकअप केला. त्या दोघांमध्ये नेहमी वादावादी होत असे. त्यामुळे कांची आणि रोहनने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीचा त्या दोघांनी कधी खुलासा नाही केला. पण कांचीने अचानक त्या दोघांच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करणे बंद केले.
कांचीचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य खूपच मजेत चालले आहे. ‘भक्ती की भक्ती’, ‘एम टीव्ही बॉक्स क्रिकेट लीग’, ‘किचन चॅम्पियन’ यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाने तिला खूपच ओळख दिली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ
-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत