Friday, March 14, 2025
Home अन्य ‘द कपिल शर्मा शो’मधील ‘ही’ अभिनेत्री आहे बेरोजगार; दीर्घकाळापासून लढतेय महाकाय आजाराशी

‘द कपिल शर्मा शो’मधील ‘ही’ अभिनेत्री आहे बेरोजगार; दीर्घकाळापासून लढतेय महाकाय आजाराशी

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ हा आज घराघरात पोहोचला आहे. या शोमधील कॉमेडी आणि अभिनयामुळे प्रेक्षक हा शो आपुलकीने बघतात. या शोचे यश म्हणजे या शोमधील कलाकार, जे त्यांच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करत असतात. अशीच या शोमधील लोकप्रिय अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिचे चाहते देखील तिच्या पोस्टची आतुरतेने वाट बघत असतात. सुमोनाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे की, तिच्याकडे आता कोणतेच काम नाहीये आणि खूप दिवसांपासून ती एका महाकाय आजाराने पीडित आहे.

सुमोना चक्रवर्तीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती वर्क‌आऊट करून खूप दमलेली दिसत आहे. या फोटोसोबत तिने एक लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे. ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. तसेच ती आजाराने पीडित आहे. तसेच तिच्या चाहत्यांना खूप दुःखही झाले आहे.

सुमोनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खूप दिवसांनंतर मी वर्कआऊट केला. मला खूप छान वाटत आहे. आता माझ्याकडे कोणतेच काम नाहीये. तरीही माझ्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी अजून तरी मी सक्षम आहे. कधी कधी मी खूप नाराज होते. त्यामुळे माझे मूड स्विंग होतात.” यानंतर सुमोनाने तिच्या आजारपणाबद्दल लिहिले आहे.

तिने लिहिले आहे की, “एक गोष्ट अशी आहे, जी मी आजपर्यंत कोणाशीच शेअर केली नाही. मी 2011 पासून एंडोमेट्रिओसिस नावाच्या एका आजाराशी लढत आहे. मी आता या आजाराच्या चौथ्या स्टेपवर आहे. जेवणाच्या योग्य वेळा, व्यायाम आणि टेन्शन न घेणे हे माझ्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. पण या लॉकडाऊनमध्ये मी भावनिक दृष्ट्या खूप कमजोर झाली आहे.”

सुमोनाने पुढे लिहिले की, “या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. पण जर माझ्या पोस्टने कोणाच्या चेहऱ्यावर हसू येत असेल किंवा कोणाला प्रेरणा मिळत असेल, तर ते माझ्यासाठी खूप चांगले आहे. आज प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या संकटातून जात आहे. परंतु तरीही दया, सद्भावना,‌ प्रेम या गोष्टी कधी आपल्यापासून लांब जाता कामा नये.”

‘द कपिल शर्मा शो’ व्यतिरिक्त सुमानाने ‘बडे अच्छे लगते हो’, ‘खोटे सिक्के’ आणि ‘नीर भरे तेरे नैना जी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-झाली लगीन घाई! अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच अडकणार विवाह बंधनात, ‘या’ पद्धतीने करणार लग्न

-मास्क न घालता रस्त्यावर ईद साजरी करत होती मुलगी, राखी सावंतने शिकवला चांगलाच धडा; पाहा व्हायरल व्हिडिओ

-अरे व्वा! अगस्त्यने टाकले पहिले पाऊल, हार्दिक आणि नताशाने केला व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा