‘इंडियन आयडल १२’ चा सूत्रसंचालक आदित्य नारायणने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रेयसी श्वेता अग्रवालशी लग्न केले होते. दोघांचे लॉकडाऊनमध्ये लग्न झाले होते. ज्यात केवळ मर्यादित पाहुणेच आले होते. आदित्यने अचानक सोशल मीडियावर जाहीर केले होते की, तो श्वेताशी लग्न करणार आहे. आता लग्नाच्या एवढ्या महिन्यांनंतर आदित्यने सांगितले की, अचानक लग्न का करण्याचे ठरवले होते. आदित्यने दिलेलं कारण प्रत्येक प्रेम करणारा व्यक्ती समजू शकतो.
माध्यमांशी बोलताना आदित्य म्हणाला की, ‘कोव्हिडमुळे आमच्या लग्नाच्या प्रक्रियेला गती मिळाली होती. शेवटच्या लॉकडाऊनमध्ये माझ्या, आणि श्वेतामध्ये बर्याच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल वादविवाद होत होते. कारण मला तिची खूप आठवण यायची. श्वेताचे घर आता जिथे आम्ही राहतो, त्यापासून अर्धा किलोमीटर दूर होते, परंतु तरीही आम्ही भेटू शकत नव्हतो. यामुळे मला खूप त्रास व्हायचा. जेव्हा तुम्ही प्रेम करतात, त्यांनी नेहमी आपल्याबरोबर राहावे, अशी तुमची इच्छा असते. म्हणून या कारणास्तव मी ठरविले की, या लॉकडाऊननंतर आमच्यात यापुढे आणखी वादविवाद किंवा भांडणे नकोत.’
आदित्यने पुढे सांगितले की, श्वेताच्या आई- वडिलांना त्याने तिचा हात कसा मागितला. आदित्य म्हणाला, ‘मी त्यांना सांगितले की, मला फरक पडत नाही की, किती लोक येतील. लग्न कोठे करावे याविषयी मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही फक्त तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्या. चांगली गोष्ट अशी आहे की, जेव्हा आम्ही लग्न केले तेव्हा, परिस्थिती थोडी ठीक होती. आता श्वेता माझ्यासोबत आहे, आणि मला एकटे वाटत नाही.’
काही दिवसांपूर्वी आदित्य, आणि श्वेता कोविड पॉझिटिव्ह आले होते, तरीही आता दोघेही अगदी ठीक आहेत. त्यांचे वैवाहित जीवन आनंदात सुरू आहे.
काही काळापूर्वी उदित नारायण यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, आदित्य आणि श्वेता १० वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. आदित्य आणि श्वेताच्या लग्नावर ते म्हणाले, ‘आदित्य आणि श्वेता १० वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मला वाटलं की, आता दोघांनाही आपलं नातं अधिकृत करण्याची योग्य वेळ आली आहे.’
आदित्य हा सध्या इंडियन आयडल शोचे सूत्रसंचालन करत आहे. आदित्य हा बर्याच वर्षांपासून, या शोचे सूत्रसंचालन करत आहे, म्हणूनच तो या कार्यक्रमाचे प्राण आहे. कोव्हिड पॉझिटिव्ह असल्यामुळे, त्याने जेव्हा शोमधून ब्रेक घेतला, तेव्हा प्रत्येकाने त्याला खूप मिस केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मागितली आईची माफी; फोटो शेअर करत म्हणाला…
-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ