प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी आज आपला ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. टीव्ही माध्यमातून ही अभिनेत्री घराघरांत पोहचली. मुंबई शहरात जन्म होऊन येथील टीव्ही क्षेत्राचा भाग होण्याचे मोठे भाग्य तिला लाभले. अशी ही अभिनेत्री एका मुलाची आई झालेली असताना वेळ काढून सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.
वेगवेगळ्या टीव्ही सिरीयल्समधील तिच्या व्यक्तिरेखेने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. तिची फिटनेस पाहता ती ४0 वर्षांची असल्याचे कोणीही म्हणू शकत नाही. म्हणूनच आजही तीचा अभिनय व फिटनेस चाहत्यांना वेड लावतो.
अभिनेत्री अनिताने २०१३ मध्ये व्यावसायिक असलेले रोहित रेड्डी यांच्याशी लग्न करून, आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. अनिता हसनंदानी एक सिंधी आहे, तर रोहित रेड्डी तेलुगु आहे. काही काळापूर्वी दोघांनाही मुलगा झाला आहे.
विशेष म्हणजे या दोघांची प्रेमकथा एकदम एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे. जिममध्ये व्यायाम करताना दोघांची भेट झाली होती. एका मुलाखतीदरम्यान अनिताने तिच्या नात्याबद्दल बोलताना रोहित यांनी तिला कशी मागणीयाचा खुलासा केला होता. “मी पबच्या बाहेर माझ्या कारची वाट पाहत होते, तेव्हा रोहितने मला पबच्या बाहेर प्रपोज केले, तोपर्यंत रोहितला माहित नव्हते की, मी एक टीव्ही अभिनेत्री आहे. कारण रोहित बहुतेकवेळा वृत्तवाहिन्या पाहत असे,” असे ती म्हणाली होती.
या दोघांच्या लग्नाला जवळजवळ ८ वर्षे झाली आहेत. दोघेही बरेचदा त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करतात, ज्यामध्ये ते बर्याच वेळा आपल्या मुलावर प्रेम व्यक्त करताना दिसतात. अशा पोस्टमधून या पती-पत्नीमध्ये एकमेकांबद्दलचे प्रेम दिसून येते.
२००१ मध्ये टीव्हीवर अनिताने ‘कभी सौतन कभी सहेली ‘या मालिकेतून पदार्पण केले होते. या मालिकेत तिच्या व्यक्तिरेखेला चांगली पसंती मिळाली होती, त्यानंतर अनिताने छोट्या पडद्यावर ‘कोई अपना सा’, ‘कसम से’, ‘प्यार तूने क्या किया’ आणि ‘नागिन’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे आणि आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप पाडली.