आजकाल टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये तीच ती जुनी कहाणी किंवा प्रेम कहाणी न दाखवता, समाजातील इतर अंगांवर देखील प्रकाश टाकला जात आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या किंवा भूतकाळात घडलेल्या काही घटना प्रेक्षकांना दाखवल्या जातात. यातच समावेश होतो तो म्हणजे कलर्स टीव्हीवरील बालविवाहावर आधारित असलेली मालिका ‘बालिका वधू.’ पूर्वी लहान असतानाच मुलींचे लग्न लावून दिले जात होते. त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीच स्वातंत्र्य नव्हते. एवढ्या लहान वयात लग्न केल्याने येणाऱ्या अडचणी, या सगळ्या गोष्टींचा समावेश या मालिकेत केला होता. नुकताच या मालिकेच्या निर्मात्यांनी ‘बालिका वधू २’ चा प्रोमो शेअर केला आहे.
या प्रोमोची सुरुवात या शोच्या ‘थीम साँग’ने होते. जे बॅकग्राउंडला वाजत आहे. यामध्ये एक लहान मुलगी छोटी गाडी चालवताना दिसत आहे. त्यावेळी तिथे एक महिला येते आणि म्हणते किती सुंदर मुलगी आहे. तिच्यासाठी एक सुंदर छोटासा नवरदेव शोधला पाहिजे. या नंतर बॅकग्राउंडला शोच्या थीमचा आवाज ऐकू येतो. यामध्ये आवाज येतो की, बालविवाह ही एक अशी प्रथा आहे, जी आजही काही ठिकाणी चालू आहे. या प्रथेला तोडण्यासाठी एक नवीन आनंदीने जन्म घेताला आहे. हा प्रोमो प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार या मालिकेत ‘आपकी नजरों ने समझा’ फेम अभिनेत्री श्रेया पटेल आणि ‘बालवीर’ फेम अभिनेता ‘वंश सयानी’ हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या भागाची कहाणी देखील पहिल्या भागाप्रमाणेच असणार आहे. अगदी लहान वयात आनंदीचे लग्न होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि नात्यांची बांधिलकी जपताना येणाऱ्या अडचणी दाखवल्या जाणार आहेत. ( Television Balika Vadhu 2 teaser release)
‘बालिका वधू २’ मध्ये रिद्धी नायक शुक्ला, केतकी दवे, सीमा मिश्रा, अंशुल त्रिवेदी, सुप्रिया शुक्ला हे कलाकार देखील असणार आहे. परंतु निर्मात्यांनी अजून ही मालिका कधी येणार आहे याची अधिकृत घोषणा केली नाहीये. बालिका वधू या मालिकेने २००८ पासून पुढे ८ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बालिका वधूप्रमाणेच ‘कसोटी जिंदगी की’, ‘साथ निभाना साथीया’, ‘ससुराल सिमर का’ आणि ‘प्रतिज्ञा’ या मालिका पुन्हा एकदा सुरू होणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नाशकात पोलिसांकडून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश! मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह २२ जणांना अटक