Saturday, April 19, 2025
Home अन्य जय भानुशाली अन् करण कुंद्रामध्ये जुंपले वाद; पतीची बाजू घेत माही म्हणाली, ‘ही औरतगिरी…’

जय भानुशाली अन् करण कुंद्रामध्ये जुंपले वाद; पतीची बाजू घेत माही म्हणाली, ‘ही औरतगिरी…’

बिग बॉसच्या घरामध्ये कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद सुरू असतात. अशात आता हे वाद बाहेर देखील पाहायला मिळत आहेत. सलमान खान सूत्रसंचालीत ‘बिग बॉस १५’ सुरू होऊन एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. अशात इथे सुरुवातीपासून प्रतिकचे भांडण पायाला मिळाले. तसेच सुरुवातीला सर्व स्पर्धकांचे एकमेकांवरील प्रेम देखील दिसले. मात्र आता या घरातील बऱ्याच मंडळींची एकमेकांबरोबर भांडणे होताना दिसत आहेत. अशात नुकताच पार पडलेल्या या शोच्या एका भागामध्ये जय भानुशाली आणि करण कुंद्रा या दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पडली. दोघांचे चांगलेच वाद झाले. काही दिवसांपूर्वीच जयचे प्रतिक बरोबर देखील जंगी भांडण झाले होते. त्यावेळी त्याने प्रतिकला खूप वाईट शब्द वापरले होते. शिवीगाळ केली होती. त्यावेळी करण जयला म्हणाला होता की, “तुझे हे वागणे मला अजिबात आवडलेले नाही.”

या सर्वांमध्ये एकीकडे जय करण बरोबर बिग बॉसच्या घरामध्ये भांडताना दिसला, तर दुसरीकडे जयची पत्नी करणवर घणाघाती टीका करताना दिसली. यामध्ये जयची पत्नी माही वीज करणवर केलेल्या टीकेमुळे सध्या ट्रोल होत आहे. आपल्या पतीच्या समर्थनार्थ ती उभी असल्याचे दाखवत तिने एक कमेंट केली आहे.

‘बिग बॉस १५’ च्या सर्व नवीन भागांचे प्रोमो कलर्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले जातात. अशात जय आणि करणचे भांडण झालेला प्रोमो देखील पोस्ट करण्यात आला होता. यावर माहीने कमेंट करत लिहिले की, “करण कुंद्राने हे सर्व जयच्या समोर बोलायला हवं, निदान जय भानुशाली करण कुंद्रा सारखी ‘औरतगिरी’ तरी नाही करत.”

जयच्या पत्नीची ही कमेंट आता जोरदार व्हायरल होत आहे. अनेक जण तिला यासाठी ट्रोल करत आहेत. यावर एकाने तिला कमेंटमध्ये लिहिले की, “आधी पूर्ण भाग तरी पाहायचा होता मॅडम. हे ‘औरतगिरी’ काय असतं? अशा महीलांमुळेच लोकांच्या आयुष्यातील व्याधी वाढतात. विचार बदला. जय आणि माहीचे वागणे पाहून मला खूप वाईट वाटत आहे. तुम्ही दोघे तुमच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत.”

तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “करण हे सर्व काही जयच्या समोरच बोलला आहे. पूर्ण प्रोमो पाहिल्यावर कमेंट करू शकली असतीस. तुझी भाषा खूप खराब आहे. करण कुंद्रा टास्कमध्ये काही तरी करताना दिसतोय, पण जयला तर शिव्या देण्यापासून सुटकाच मिळत नाहीये.”

https://twitter.com/drshivani1401/status/1448298401175465989?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1448298401175465989%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Fphoto-gallery%2Fentertainment%2Ftelevision%2Fbigg-boss-15-mahi-vij-gets-trolled-for-his-comment-on-karan-kundrra-for-womanhood-fans-gave-this-reaction

जयची पत्नी माही वीज ही देखील एक अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तसेच तेलुगू आणि मल्याळम भाषिक चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. ‘कैसे लगी लगन’, ‘लागी तुझसे लगन’, ‘बैरी पिया’ अशा अनेक मालिकांमध्ये तिने आतापर्यंत अभिनय केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’मधील ‘हे’ स्पर्धक राडा घालण्यात ठरत आहे अव्वल

-अरर! ‘बिग बॉस १५’ मधील ‘या’ स्पर्धकांना चाहत्यांकडून ‘बोरिंग कंटेस्टेंट्स’चा टॅग; पाहा यादी

-बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास

हे देखील वाचा