Saturday, June 29, 2024

श्वेता तिवारी ते शरद मल्होत्रापर्यंत, जाणुन घ्या गणेशोत्सवासाठी कशी केलीय टीव्ही कलाकारांनी तयारी

ज्या सांची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो अखेर तो दिवस उजाडला आहे. आज सर्वत्र गणपती बाप्पांचे जल्लोषात आणि वाजत गाजत आगमन होत आहे. आता पुढील दहा दिवस सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा आणि भक्तिमय वातावरण दिसणार आहे. कलाकारापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच लोकं गणरायाच्या भक्तीत रममाण झाले आहेत. यात टीव्ही कलाकार देखील मागे नाही दरवर्षी टेलिव्हिजन क्षेत्रातही कलाकार गणेश चतुर्थी उत्साहात साजरी करतात. टीव्ही कलाकार गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी विशेष तयारी करतात. मात्र, यावेळी जरी कोरोना महामारीमुळे कलाकारांना पूर्वीप्रमाणे मोठे कार्यक्रम आयोजित करता आले नसले तरी त्यांच्या भक्तीत कोणतीही कमी दिसून येत नाही. टेलिव्हिजनवरील काही कलाकारांच्या गणपतीची तयारी पाहूया.

श्वेता तिवारी :

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी म्हणाली की, “पूर्वी मला वाटायचे की लोक फॅशनसाठी गणेश उत्सव साजरा करतात.” पण हे खरं आहे. अनेकजण गणेश उत्सव फक्त हौस आणि फॅशन म्हणूनच साजरा करतात. अनेकांची देवावर भक्ती नसते, पण मनाला आनंद वाटवा म्हणून काही लोक हा सण साजरा करतात. मात्र, या वर्षी कोरोनाने सर्वकाही बदलले आहे, आता फक्त ज्यांचा देवावर विश्वास आहे, तेच लोक हा सण साजरा करत आहे. यावेळी ती घरी गणेशाची स्थापना अत्यंत साध्या पध्दतीने करणार आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालनही करून पुढील कार्यक्रम आयोजित करत आहे.

शरद मल्होत्रा :

अभिनेता शरद मल्होत्रा ​​गेल्या ११ वर्षांपासून गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला घरी घेऊन येतो. माध्यमातील वृत्तानुसार, शरदने यावेळीही गणपतीची स्थापना केली आहे. तसेच तो म्हणाला की,“ यावेळी गणेशोत्सवात कोरोना संसर्गाचे पूर्णपणे पालन करणार आहे.” टीव्ही अभिनेता शरद मल्होत्रा ​​त्याच्या उत्कृष्ट अभिनय आणि मोहक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो.

टीना दत्ता :

दरवर्षी अभिनेत्री टीना दत्ता गणेश उत्सवासाठी आपल्या मित्रांना घरीच बोलावते. तसेच ती गणेश विसर्जनासाठी सर्व मित्रांसोबत सुद्धा जाते. अभिनेत्री टिना यावर्षी मित्रांना घरी बोलावणार नाही. ती या वेळी कोरोना संसर्गाची नियामवलीचे पालन करून हा सण साजरा करणार आहे. तसेच टीना यावर्षी गणपती बाप्पासाठी स्वत:च्या हातने प्रसाद बनवणार आहे.

यावर्षी सुद्धा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी कलाकार आणि सामान्य लोकांच्या उत्साहात अजिबात कमतरता आली नाहीये. सर्व नियमनाचे पालन करून उत्साहाने हा सण साजरा केला जात आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर एन्जॉय करताना दिसले ‘ही मॅन’; चहा पित म्हणाले, ‘चीयर्स!’

-‘मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाले होते’, म्हणत ऋतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

-रवी तेजा ईडीच्या कार्यालयात हजर, मनी लॉन्ड्रिंगसह ‘या’ प्रकरणीही करण्यात आली चौकशी

हे देखील वाचा