Friday, August 8, 2025
Home अन्य वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री हिना खानने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत स्वत: दिली माहिती

वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री हिना खानने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत स्वत: दिली माहिती

टीव्ही अभिनेत्री हिना खानवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच तिच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. जेव्हा हिनाच्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा अभिनेत्री शूटिंगच्या कामासाठी काश्मीरला होती. ही बातमी समजताच ती, तातडीने मुंबईत आपल्या घरी परत आली आहे. हिना खान तिच्या वडिलांच्या अगदी जवळ होती म्हणून ती, अजुन या धक्क्यातून बाहेर पडू शकली नाही आहे. म्हणूनच, तिने एक निर्णय घेतला आहे.

हिना काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहील, परंतु कामाच्या वचनबद्धतेमुळे हिनाच्या जागी तिची टीम सोशल मीडिया अकाउंट सांभाळणार आहे.

हिनाने इंस्टाग्राम स्टोरीवर तिने याबाबत माहिती दिली आहे. तिने लिहिले की, ‘या वेळी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण वेळी आपल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल तुमचे खूप खूप आभार. दरम्यान, माझ्या सोशल मीडिया अकाऊंटची हाताळणी आता कार्य वचनबद्धतेसाठीच माझे सहकारी करतील. धन्यवाद.’

हिना तिच्या कहाणीबद्दल एकदा म्हणाली होती की, “मी कुटुंंबाला न सांगताच मुंबईला आले होते. त्यावेळी मी २० वर्षांची होते. प्रॉडक्शन टीमने मला राहण्यासाठी जागा शोधण्यास मदत केली होती. एका आठवड्यानंतर मी हे माझ्या वडिलांना सांगितले. त्यांना त्यावेळी मोठा धक्का बसला होता. माझ्या आईच्या मैत्रिणीने आणि नातेवाईकांनी आमच्याशी संबंध मोडले होते. त्यानंतर मी आई-वडिलांना समजावले आणि, वडील म्हणाले की, ‘तुला आधी तुझा अभ्यास पूर्ण करावा लागेल. मग मी तुला पाठिंबा देईन.'” शूटिंग करत हिनाने आपले शिक्षण पूर्ण केले होते.

हिना ही  तिच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकत असत. हिनाचे हे करियर तिच्या वडिलांना अजिबात मान्य नव्हते, परंतु हिनाने कमी वेळातच आपले नाव खूप कमावले. त्यामुळे तिच्या वडिलांना तिचा अभिमान वाटू लागला, आणि त्यांनी तिला पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती.

हिनाने टीव्ही मालिकांव्यतिरिक्त बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती ‘हॅक्ड’ या चित्रपटात झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एक अभिनेता जोमात, तर दुसरा कोमात! वरुण धवनने मारली झोपलेल्या वरुण शर्माच्या अंगावर उडी, पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाथी कमिंग! भन्नाट डान्स करत अभिनेता संदिप पाठकने समाजाला दिला मोलाचा सल्ला

-मराठी अभिनेता अंशुमन विचारेच्या चिमुकलीने सांगितले कोरोनाचे नियम पाळायला, म्हणाली ‘लॉकडाऊन आहे, बाहेर पोलीस…’, पाहा गोड व्हिडिओ

हे देखील वाचा