नुसता टेरर! केरळ पोलीसांसाठी अल्लू अर्जुनचा खास व्हिडीओ, खाकीमध्ये अल्लूला पाहून गुंडाची झालीय पळता भुई थोडी


दक्षिण इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा परिचय देण्याची गरजच नाही. आपल्या जबरदस्त अभिनय आणि दणदणीत नृत्य प्रतिभेमुळे तो सर्वांचाच आवडता आहे. तसे, अल्लू दिसायला बराच कूल आहे, परंतु या दिवसांत तो पोलीस बनून गुंडांचे टेन्शन वाढविताना दिसत आहे. त्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वास्तविक हा व्हिडिओ केरळ पोलिसांची जाहिरात आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संदेश देण्यासाठी केरळ पोलिसांनी एक अतिशय मनोरंजक जाहिरात तयार केली आहे. यासाठी त्यांनी टॉलीवूडचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची मदत घेतली आहे. व्हिडीओमध्ये, अर्जुन पोलिसांच्या वेशभूषेत दिसला आहे. त्याचा बोल्ड लूक लोकांना बराच आवडला. फक्त बटण दाबून अडचणीत अडकलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिस घटनास्थळी कसे पोहोचतात, हे जाहिरातीत दाखवले आहे.

केरळ पोलिसांची ही जाहिरात अत्यंत फिल्मी स्टाईलमध्ये बनविण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये, अल्लू अर्जुन दुचाकीवर स्वार होऊन पोलिसांच्या गेटअपमध्ये एखाद्या हिरोसारखा एन्ट्री करताना दिसला. त्याला पाहून गुंडांचे हात-पाय थरथर कापू लागतात. केरळ पोलिसांचा हा अ‍ॅड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अल्लू अर्जुनमुळे ही जाहिरात सुपरहिट झाली आहे. प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे केरळ पोलिसही खूश आहेत. तसेच, यामुळे लोकांच्या मनातली पोलिसांची प्रतिमा नक्कीच सुधारेल असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे लोक कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता पोलिसांची मदत घेऊ शकतील, अशी त्यांना आशा आहे.

अल्लू अर्जुनच्या वर्क फ्रंटबद्द्ल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘पुष्पा’ सिनेमात दिसणार आहे. हा एक अ‍ॅक्शन, ड्रामा चित्रपट असेल. 13 ऑगस्टला केरळसह इतर राज्यातही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊन दरम्यान चित्रपटाचे शूटिंग बर्‍याच दिवसांपासून थांबले होते. नंतर जेव्हा शूटिंग पुन्हा सुरू झाले तेव्हा ग्रुपमधील 6 जणांना कोरोना झाला होता. त्यामुळे शूटिंगला पुन्हा ब्रेक लागला. पण आता पुन्हा काम सुरू झाले आहे.

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.