Saturday, April 11, 2026
Home साऊथ सिनेमा ‘तेलुगू इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनची विजेती बनली ‘ही’ गायिका, मिळाली मोठी रक्कम

‘तेलुगू इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनची विजेती बनली ‘ही’ गायिका, मिळाली मोठी रक्कम

गायनाच्या जगातला सर्वात मोठा शो ‘इंडियन आयडल’ मानला जातो. नुकतेच ‘तेलुगु इंडियन आयडल १’च्या पहिल्या सीझनची सांगता झाली. या ‘तेलगू इंडियन आयडल’मध्ये आपल्या सुरेल आवाजाने सर्वांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारी या पहिल्या सीझनची विजेती बीव्हीके वागदेवी (BVK Vagdevi) बनली आहे. ‘इंडियन आयडल सीझन १’च्या ग्रँड फिनालेच्या निमित्ताने, दक्षिण सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी (Chiranjeevi) हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

बीव्हीके वागदेवीला मिळाले लाखांचे बक्षीस
कोणताही रियॅलिटी शो जिंकल्यास विजेत्यावर बक्षिसे आणि पैशांचा वर्षाव होतो. गायिका बीव्हीके वागदेवी हिलाही अशीच संधी मिळाली. ‘तेलुगु इंडियन आयडल सीझन १’ची विजेती बीव्हीके वागदेवीला बक्षीस म्हणून १० लाख रुपयांची मोठी रक्कम मिळाली. इतकेच नाही, तर बीव्हीके वागदेवीला साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार चिरंजीवी यांच्या हस्ते चमकणारी ट्रॉफीही मिळाली. याशिवाय या सीझनचा उपविजेता श्रीनिवास ठरला, तर तिसर्‍या क्रमांकावर वैष्णवी होती. या दोन्ही गायकांना प्रत्येकी दोन लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. (telugu indian idol season 1 winner bvk vagdevi)

‘तेलुगु इंडियन आयडल’ ग्रँड फिनालेमध्ये ‘हे’ स्टार्सही उपस्थित होते
या ग्रॅंड फिनालेमध्ये चिरंजीवींशिवाय दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबती (Rana Daggubati) आणि अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) देखील उपस्थित होते. खरंतर हे दोन्ही सुपरस्टार कलाकार त्यांच्या आगामी ‘विराट पर्वम’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये आले होते. ‘तेलगू इंडियन आयडल’च्या पहिल्या सीझनच्या शानदार कामगिरीनंतर, चाहते आता त्याच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत, जो कदाचित पुढच्या वर्षी सुरू होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा