प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणाऱ्या ‘या’ विनोदी अभिनेत्याला बनायचं होतं भलतंच काही


विनोदी कलाकारांबद्दल बोलयचे झाले, तर दक्षिण भारतात असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या सर्वोत्कृष्ट कॉमेडीसाठी ओळखले जातात. या अत्यंत प्रसिद्ध नावांपैकी एक म्हणजे सुनील वर्मा. जो एक प्रसिद्ध अभिनेता आणि तेलगू सिनेमाचा विनोदकार आहे.

सुनील वर्माने रविवारी म्हणजेच 28 फेब्रुवारीला त्याचा वाढदिवस साजरा केला. सुनील इंडस्ट्रीमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. तो तरूण असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या आईने त्याला कठोर परिश्रम करून वाढविले.

सुनील लहानपणापासूनच चिरंजीवीचा चाहता आहे. चिरंजीवी यांच्या प्रमुख भूमिकेत असलेले चित्रपट पाहून सुनीलच्या चित्रपटसृष्टीतल्या आकांक्षा वाढल्या. प्राथमिक शाळेपासून हे चित्रपट पाहत सुनीलने एक चांगले डान्सर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. स्थानिक नृत्य स्पर्धेतही त्याने पुरस्कारही जिंकले. त्याच्या एका शिक्षकाने त्याला ललित कला विषयातील बॅचलर्सबद्दल सुचवले आणि म्हणूनच त्याने हा अभ्यासक्रम सुरू केला. 1995 मध्ये त्याने डान्सद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर तो हैदराबादमधील नृत्य शाळेत दाखल झाला.

सुनीलला चित्रपटात खलनायक व्हायचे होते, परंतु दिग्दर्शकाने त्याला विनोदी भूमिका दिली आणि आता तो सर्वोत्तम विनोदी कलाकारांपैकी एक आहे. इंडस्ट्रीत सुनीलची सुरुवात खूप हळू हळू झाली. त्याचा ‘सेकंड हैंड’ हा चित्रपट निर्मितीदरम्यान थांबला होता. ‘प्रेमकथा’ आणि ‘स्वयंवरम’ चित्रपटाद्वारे त्याला इंडस्ट्रीमध्ये संधी मिळाली. ‘चिरुनावुतो’ आणि ‘नुवे कवली’ हे त्याचे पहिले चित्रपट होते ज्यात अभिनय करून त्याला खरी ओळख मिळाली.

सुनीलने मुख्य अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीत प्रथमच ‘अंदला रामुडू’ चित्रपटात काम केले. या सिनेमात आरती अग्रवाल त्याची सहकलाकार होती. 2006 मध्ये, त्याने मुख्य अभिनेता म्हणून दुसरा चित्रपट केला, ज्याचे नाव होते ‘मरीयदा रमन्ना’. चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते एस.एस. राजामौली यांनी केले होते. सुनीलच्या या चित्रपटाचा हिंदी रिमेक अजय देवगन आणि संजय दत्तचा चित्रपट सन ऑफ सरदार आहे. तसेच, सुनीलने 150 हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सुनीलला फुफ्फुसाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आता सुनील अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटात दिसणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.