तेलुगू चित्रपट सृष्टीतील अभिनेता रवी तेजाचा काही दिवसांपूर्वीच ‘क्रॅक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या या चित्रपटाला सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद देखील मिळाला होता. त्याचा हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर सर्वत्र अशी चर्चा होती की, रवी तेजा याने त्याची फी वाढवली आहे. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर रवी तेजा त्याच्या ‘खिलाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी तो इटलीला गेला होता. त्याने इटलीमधील काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट देखील केले होते. हे फोटो सगळ्यांना खूपच आवडले होते. आता नुकताच त्याच्या खिलाडी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.
‘मास महाराजा’ रवी तेजा याच्या खिलाडी या चित्रपटाचा टीजर मंगळवार (13 एप्रिल) सर्वत्र प्रदर्शित झाला. हा टीजर बघूनच सगळेजण अंदाज लावत आहे की, हा चित्रपट देखील खूप सुपरहिट ठरणार आहे. या चित्रपटातरवी तेजा याचा खूपच अँग्री लूक बघायला मिळतो. कधी तो हातात हातोडा घेऊन लोकांना मारताना दिसतो, तर कधी त्याच्या हातात बंदूक दिसते. या टीजरमध्ये तो एका अपराधाच्या भूमिकेत दिसतो, एका ठिकाणी त्याने जेलमधील कैदयाची कपडे देखील घातली आहे. हाती आलेल्या काही बातम्यांनुसार या चित्रपटात रवी तेजा याचा डबल रोल दिसणार आहे. त्यातील त्याचे एक नायकाचे तर दुसरे खलनायकाचे पात्र असणार आहे. आता नक्की या चित्रपटात काय आहे? याची माहिती तर आपल्याला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळणार आहे. पण तरीही या चित्रपटाच्या टीजरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या चित्रपटाच्या टीजरला यूट्यूबवर प्रदर्शित केल्यानंतर केवळ एका तासातच दोन लाखापेक्षाही जास्त व्हयूज मिळाले होते. आणि गेल्या काही दिवसात हा आकडा ४२ लाखांच्या पुढे गेला आहे. खिलाडी या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘रमेश वर्मा पेनमेट्सा’ यांनी केले आहे तर सत्यनारायण कोनेरू हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात रवी तेजासोबत मीनाक्षी चौधरी आणि डिंपल हयाती दिसणार आहे. हा चित्रपट २८ मेला सगळ्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, परंतु कोरोना महामारीमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलू देखील शकते, अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे.