Monday, June 23, 2025
Home साऊथ सिनेमा ठरलं तर! रजनीकांत यांच्या ‘१६९’व्या सिनेमाच्या नावानेच केलाय धमाका, सिनेमाचे पोस्टरही रिलीझ

ठरलं तर! रजनीकांत यांच्या ‘१६९’व्या सिनेमाच्या नावानेच केलाय धमाका, सिनेमाचे पोस्टरही रिलीझ

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचा एक सिनेमा येऊ घातलाय. या सिनेमाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार हे करत आहेत. रजनीकांत यांच्या या सिनेमाचे नाव जाहीर झाले आहे. या सिनेमाचे नाव काय असणार आहे, हे आपण जाणून घेऊया.

रजनीकांत (Rajinikanth) यांच्या आगामी सिनेमाचं नाव ‘जेलर’ (Jailer) असणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचं पोस्टर जारी करत याच्या नावाचीही घोषणा केली आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये रक्ताने माखलेले चाकू दिसत आहे. सिनेमाचे पोस्टर सन पिक्चर्स यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

सिनेमासाठी चाहते भलतेच उत्सुक
रजनीकांत यांच्या या सिनेमासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. या सिनेमाचे नाव आणि पोस्टर पाहून असे वाटत आहे की, हा सिनेमा ऍक्शनने भरलेला असेल. पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता आणखीच ताणली आहे. या सिनेमाची निर्मिती सन पिक्चर्स यांनी केली आहे. तसेच, सिनेमाला अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे.

सिनेमात ऐश्वर्या रायची होणार एन्ट्री?
या सिनेमाच्या इतर कलाकारांबद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल. माध्यमांतील वृत्तांनुसार, या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन, शिवकार्तिकेयन, प्रियांका अरुल मोहन, राम्या कृष्णन आणि योगी बाबू यांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळू शकतात. असे असले, तरीही कन्नड सुपरस्टार शिवराजकुमार यांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे की, ते या सिनेमाचा भाग असणार आहेत. तसेच रजनीकांत यांच्यासोबत त्यांच्या सीनची शूटिंग बंगळुरू आणि म्हैसूर येथे केली जाईल.

रजनीकांत हे यापूर्वी २०२१ साली आलेल्या ‘अन्नाथे’ या सिनेमात झळकले होते. या सिनेमात त्यांच्यासोबत कीर्ती सुरेश आणि नयनतारा यांच्याही मुख्य भूमिका होत्या. त्यांच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये रोबोट सिनेमा आघाडीवर आहे. रोबोट हा सिनेमा २०१० साली प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बॉलिवूडमधील बापमाणसं! ज्यातील काहींनी मुलींना बनवले यशस्वी, तर काहींनी लावली आयुष्याची वाट

हॉटनेसने तरुणांची झोप उडवणाऱ्या अभिनेत्री ईशा गुप्ताने लग्नाबद्दल केला मोठा खुलासा,असा आहे प्लॅन

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या लवस्टोरीचा वरुण धवन झाला लवगुरू, व्हिडिओ होतोय व्हायरल

हे देखील वाचा