Saturday, June 29, 2024

भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

अभिनेत्री कंगना रणौतला तिच्या अभिनयाव्यतिरिक्त निर्भीडतेसाठी ओळखले जाते. ती नेहमीच प्रत्येक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करते आणि कधीही मागे फिरत नाही. तिला एक ‘दबंग अभिनेत्री’ म्हटले जाते. पण ‘थलायवी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी, तिची एक वेगळीच बाजू पाहायला मिळाली. खरं तर यावेळी, ती खूपच भावुक झाली आणि रडू लागली.

ट्रेलर लाँचवेळी कंगना रणौत या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे कौतुक करत होती. ती सांगत होती की, विजयने तिच्या टॅलेंटला ओळखले आणि नेहमी तिला प्रेरणा दिली. याबद्दल बोलताना कंगना खूप भावुक झाली आणि रडू लागली. रडायला येत असल्याकारणाने कंगना जास्त बोलू शकली नाही आणि आपल्या सीटवर जाऊन बसली. आता कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कंगनाचा व्हिडिओ शेअर करताना एका चाहत्याने लिहिले की, “थलायवी या चित्रपटाचा दिग्दर्शक विजयबद्दल बोलताना कंगना खूप भावनिक झाली.” कंगनानेही ही पोस्ट शेअर केली आहे.

कंगनाने एक ट्वीट केले आणि लिहिले, “मी स्वत: ला बब्बर शेरनी म्हणते, कारण मी कधीच रडत नाही. मला रडवण्याचा हक्क मी कोणालाच देत नाही. शेवटच्या वेळी मी कधी रडले हेही मला आठवत नाही. पण आज मी रडले, खूप रडले आणि ते खूप चांगले होते. #thalaivitrailer”

https://twitter.com/KanganaTeam/status/1374275689608716290

चित्रपटाविषयी बोलायचे झाले, तर कंगना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ती तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांद्वारे चित्रपटाचा ट्रेलर खूपच पसंत केला गेला. ट्रेलरमध्ये कंगनाने जयललिता यांची मजबूत बाजू दाखविली आहे.

नुकत्याच झालेल्या, 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कंगनाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्या नावी केला आहे. तिला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

-पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’

हे देखील वाचा