बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माते यांच्यावर २०००मध्ये हल्ला करणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. तो परोल रजेवर गेला होता व परोल रजेचा कालावधी पुर्ण झाल्यावरही तो तीन महिने बाहेर मोकळा फिरत होता. ठाणे जिल्ह्यात त्याला अटक करण्यात आली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ५२ वर्षीय सुनील विश्वनाथ गायकवाड या शार्प शुटरला शुक्रवारी रात्री ९ वाजता कळवा भागात पकडण्यात आले. “आम्हाला माहिती मिळाली होती की गायकवाड त्या परिसरात येणार आहे. त्यामुळे आम्ही सापळा रचला होता, ” असे यावेळी तो अधिकारी म्हणाला.
“या आरोपीविरुद्ध खूनाचे ११ आरोप असून खूनाच्या प्रयत्नाचे एकूण ७ आरोप आहेत. यातील एका घटनेत त्याने दिग्दर्शक राकेश रोशन यांनाही मारण्याचा प्रयत्न केला होता,” असेही तो अधिकारी पुढे म्हणाला.
२०००मध्ये राकेश रोशन यांना त्यांच्या सांताक्रूज कार्यालयाजवळ गोळी मारण्यात आली होती. आरोपींनी ६ गोळ्या मारल्या होत्या, त्यातील २ रोशन यांना लागल्या होत्या. त्याच वर्षी रोशन यांचे पुत्र ह्रितीक रोशन यांचा लोकप्रिय चित्रपट कहो ना प्यार हैं रिलीज झाला होता.
तर राकेश रोशन यांनी बॉलीवूडमध्ये अभिनेता, निर्माता, स्क्रीनरायटर, एडिटर अशी कामे केली आहेत.
गायकवाड खुनाच्या गुन्ह्यात अजीवन कारावास भोगत आहे. तसेच तो नाशिक केंद्रिय कारागृहात बंद होता. त्याला २८ दिवसांची परोल रजा मिळाली होती. तो २६ जूनपासून कारागृहाच्या बाहेर होता. परोलचा अवधी पुर्ण झाल्यावर त्याला जेलमध्ये परतणे बंधणकारक होते. परंतू तो फरार झाला परंतू काल पोलीसांनी सापळा रचून त्याला पकडले.
१९९९ ते २००० या काळात गायकवाड अनेक घटनांमध्ये सामील होता. याच कालावधीत नाशिकमधील एका घरफोडीतही तो सामील होता. तिथे त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला गोळी मारली होती. सध्या त्याला पंतनगर पोलीसांकडे सोपविण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर केस दाखल केली जाणार आहे.