टीव्हीवरील नवा रियालिटी शो ‘द 50’ जोरदार सुरुवातीमुळे चर्चेत आला आहे. वेगळ्या आणि हटके संकल्पनेमुळे प्रेक्षकांचे लक्ष या शोने वेधून घेतले असून, पहिल्याच दिवशी झालेल्या एलिमिनेशनने सर्वांनाच धक्का दिला आहे. या शोमध्ये 50 सेलिब्रिटी, युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले आहेत. मात्र, शो सुरू होण्याआधीच युट्यूबर वंशज सिंग हा पहिला स्पर्धक बाहेर पडला आहे.
द 50 (The 50)ची सुरुवात अत्यंत धमाकेदार झाली. पहिल्या टास्कसाठी सर्व 50 स्पर्धक अरेनात दाखल झाले. येथे ‘लायन’ने त्यांचे स्वागत करत गेमचे नियम समजावून सांगितले. त्यानंतर 5-5 जणांचे गट तयार करून टास्क देण्यात आला. या टास्कनंतर पाच टीम्स सेफ ठरल्या, तर उर्वरित पाच टीम्सना एलिमिनेशन राउंडला सामोरे जावे लागले.
एलिमिनेशन राउंडमध्ये एकूण 25 स्पर्धक होते. यामधून म्युझिकल चेअरच्या माध्यमातून 15 जणांना सेफ करण्यात आले. उरलेल्या 10 स्पर्धकांपैकी एका सदस्याला शोमधून बाहेर काढायचे होते.
लायनने कॅप्टन करण पटेल, प्रिन्स नरुला, कृष्णा श्रॉफ, शिव ठाकरे आणि फैजू यांना निर्णय घेण्याची जबाबदारी दिली. पाचही कॅप्टनने एकत्र येत युट्यूबर वंशज सिंगचे नाव घेतले आणि त्यामुळे तो शोमधून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक ठरला.
आपल्या एलिमिनेशननंतर वंशज सिंग भावूक झाला. त्याने सांगितले की, इतर स्पर्धकांना ओळखण्याआधीच आणि कोणाशीही नाते जोडण्याआधीच शोमधून बाहेर पडावे लागल्याची खंत आहे. कॅप्टन्सच्या निर्णयामुळे तो निराश झाला असून, शोमध्ये आपल्याला फारच कमी वेळ मिळाल्याचे त्याचे म्हणणे आहे.
वंशज सिंगच्या बाहेर पडण्यानंतर आता शोमध्ये 49 स्पर्धक उरले आहेत. ‘द 50’ हा शो एकूण 50 दिवस चालणार असून, दररोज एक स्पर्धक एलिमिनेट होणार आहे. त्यामुळे पुढील दिवसांत स्पर्धा आणखी रंगतदार होणार, यात शंका नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ज्या आडनावाची इंडस्ट्रीत चलती, त्याच नावामुळे करिअरमध्ये अडथळे; काम गमावल्याची वेदना उघड










