टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये द 50 (The 50)नावाचा नवीन रियालिटी शो सध्या खूप गाजत आहे. यामध्ये 50 सेलिब्रिटी स्पर्धक आहे. आणि काही टास्क दरम्यान त्यांच्यामध्ये नेहमीच वाद हे चालू असतात. तर स्पर्धक एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर उघडपणे चर्चा करत आहेत अलीकडेच, शोमधील स्पर्धक भव्या सिंगने तिची सह-स्पर्धक दिव्या अग्रवालच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवाय, भव्याने दिव्याला “गोल्ड डिगर” असेही म्हटले आहे, ज्यामुळे अभिनेत्रीच्या टीमने एक विधान केले आहे.
बुल अँड इंटेलिजेंस या टास्कमध्ये दिव्याने अर्चनाला मेंदू नसल्याचा म्हणले, भव्याला हे आवडले नाही, कारण तिची अर्चनासोबत चांगली मैत्री आहे. त्यानंतर, सपना चौधरीशी बोलताना तिने दावा केला की दिव्या तिच्या पती सोबत राहत नाही. भव्याने असा दावा केला की दिवाळीच्या दिवशी त्यांच्यात जोरदार वाद झाला होता आणि दिव्याबद्दल तिनेच खुलासे केले होते. दिव्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिनेच सलग अनेक दावे केले.
दिव्या अग्रवालच्या टीमने एक निवेदन जारी करून लिहिले की, जे काही सांगितले गेले आहे ते पूर्णपणे अयोग्य होते. ‘मी काहीही बोलणार नाही’ असे वारंवार म्हणणे आणि नंतर कोणत्याही आधाराशिवाय वैयक्तिक माहिती पसरवणे, हा गेम कधीही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याला लक्ष्य करण्यासाठी नव्हता. हा गेम ताकद, रणनीती आणि मानसिक क्षमता दाखवण्यासाठी डिझाइन केलेला आहे. शोमध्ये एखाद्याचे वैयक्तिक जीवन ओढणे, हे पूर्णपणे अयोग्य आहे.
दिव्या अग्रवालच्या टीमने पुढे म्हटले आहे की, “लोकांना आमंत्रित करण्याची तिची सवय तिच्या दयाळू आणि मोकळ्या स्वभावाचे तो भाग आहे. तिला लोका जोडते कारण तिला घरी असल्यासारखे वाटवे. ती अशीच आहे. हे भावनिक अवलंबित्व किंवा एकटेपणा म्हणून चित्रित करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, हे चित्रपट आणि मालिका होणार प्रदर्शित










