रिअॅलिटी शो ‘द 50’मध्ये एक जबरदस्त ड्रामॅटिक क्षण पाहायला मिळाला आहे. शोदरम्यान अभिनेता करण पटेल यांनी अचानक शो सोडण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. होस्ट ‘द लायन’ आणि इतर सर्व 49 स्पर्धकांसमोर उघडपणे ही घोषणा केल्याने घरातील वातावरणच बदलून गेले.
मेकर्सनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये करण पटेल (Karan patel)हे “I am quitting the show right now, if this is acceptable” असे म्हणताना दिसतात. व्हिडीओमध्ये होस्ट ‘द लायन’ टास्कची घोषणा करताना म्हणतात, “प्लेयर बहाएंगे पसीना, फॅन कमाएंगे पैसा”. त्यानंतर सर्व स्पर्धक वर्कआउट टास्कमध्ये सहभागी होतात. टास्क संपल्यानंतर जेव्हा कॅलरी रिपोर्ट जाहीर होतो, तेव्हा निकाल वेगळे असल्याचे सांगितले जाते. याच क्षणी करण पटेल नाराज होत आपला संताप व्यक्त करतात आणि शो सोडण्याची घोषणा करतात.
‘द 50’च्या पहिल्याच एपिसोडमध्ये मोठे घडामोडी पाहायला मिळाल्या. पहिल्या दिवशी 10 स्पर्धकांना कॅप्टन म्हणून निवडण्यात आले होते. यात रजत दलाल, मिस्टर फैजू, प्रिन्स नरुला, मोनालिसा, रिद्धी डोगरा, शिव ठाकरे, निक्की तंबोली, कृष्णा श्रॉफ, करण पटेल आणि उर्वशी ढोलकिया यांचा समावेश आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे वंशज सिंह यांना पहिल्याच दिवशी शोमधून बाहेर काढण्यात आले.
रिअॅलिटी शो ‘द 50’ सध्या जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत असून कलर्स टीव्हीवर रात्री 10:30 वाजता प्रसारित केला जातो. बनिजय एशिया यांनी या शोची निर्मिती केली आहे. या शोमध्ये टेलिव्हिजन, चित्रपट आणि सोशल मीडियातील 50 प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. दिव्या अग्रवाल, नीलम गिरी, निक्की तंबोली, फैसल शेख उर्फ फैजू, शिव ठाकरे, अर्चना गौतम यांसह अनेक सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून दिसत आहेत.
आता प्रश्न असा आहे की, करण पटेल खरंच ‘द 50’ सोडणार का, की पुढील भागांमध्ये ते आपला निर्णय बदलणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; ‘या’ दमदार फिल्म्स-सीरिज होणार रिलीज










