Friday, April 25, 2025
Home अन्य TMKOC: कोणी पती-पत्नी, तर कोणी भाऊ-बहीण; पडद्यावरच नव्हे, खऱ्या आयुष्यातही ‘हे’ कलाकार आहेत नातेवाईक

TMKOC: कोणी पती-पत्नी, तर कोणी भाऊ-बहीण; पडद्यावरच नव्हे, खऱ्या आयुष्यातही ‘हे’ कलाकार आहेत नातेवाईक

सब टीव्हीचा सुप्रसिद्ध ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या कॉमेडी शोने नेहमी चाहत्यांना हसवले आहे. या शोने मागील १३ वर्षापासून आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. या शोमधील काही पात्र इतकी लोकप्रिय झाली आहेत की, आजही त्यांना त्याच्या मालिकेतील नावाने ओळखले जाते. इतकी वर्ष चालणारा हा पहिलाच शो असेल. या शोची खासियत अशी की, या कलाकारांच्या अभिनयाने या शोची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत चालली आहे. त्याचबरोबर असे अनेक कलाकार आहेत, जे सुरुवातीपासून या शोचा भाग होते किंवा अजूनही आहेत.

इतकी वर्षे एकत्र काम करणारे हे कलाकार आता एका कुटुंबासारखे दिसतात. मग तो जेठालाल असो किंवा त्याचा मेहुणा सुंदरलाल, किंवा मग बाघा किंवा बावरी. या शोमधील प्रत्येक पात्र हे खास आहे आणि हे सर्व पात्र अजूनही प्रेक्षकांच्या हृदयात आहेत. परंतु अजूनही अनेक प्रेक्षकांना कदाचित माहिती नसेल की, या शोमध्ये दिसणारे काही कलाकार हे फक्त पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यात ही कुटुंबातील सदस्य आहेत. कोण पती – पत्नी आहेत तर कोण भाऊ – बहीण आहेत.

दयाबेन आणि सुंदरलाल
या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी या मालिकेतील प्रसिद्ध पात्र आहे. त्याचबरोबर मयूर वकानीने दयाबेनच्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. ही सुपरहिट बहीण – भावांची जोडी म्हणजे फक्त पडद्यावरच नाही, तर हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे भाऊ बहीण आहेत. सुंदरलाल उर्फ मयूर हा दयाबेनचा खरा भाऊ आहे.

टप्पू आणि गोगी
या शोचा आणखी लोकप्रिय चेहरा म्हणजे टप्पू. अर्थात जुना टप्पू म्हणजेच भव्य गांधी ज्याने शो सोडला आहे. मात्र त्याने वयाच्या ९ वर्षांपासून या शोमध्ये टप्पूची भूमिका साकारली. त्याचबरोबर समय शाह उर्फ गोगी हा देखील एक लोकप्रिय चेहरा आहे. खरं तर भव्य आणि समय हे चुलत भाऊ आहे. या दोघांनीही या शोमध्ये मित्रांची भूमिका साकारली आहे.

रीटा रिपोर्टर आणि मालव राजदा
मालव राजदा हे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर या शोमध्ये प्रिया आहुजा ही रीटा रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. मात्र, खूप कमी लोकांना माहीत आहे की, हे दोघे खऱ्या आयुष्यात पती – पत्नी आहेत. तर काही दिवसांपूर्वीच प्रिया आहुजा उर्फ रीटा रिपोर्टर पुन्हा शोमध्ये परतली आहे.

साल २००८ मध्ये सुरू झालेला हा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका अजूनही सुरू आहे. शोच्या लोकप्रियतेमागील एक प्रमुख कारण म्हणजे त्यातील कलाकार. प्रत्येक कलाकाराची स्टाईल वेगळी आहे. म्हणूनच मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ही मालिका सर्वांना बघायला आवडते. याच शोमुळे हे कलाकार घराघरात पोहचले आहेत.

 

 

हे देखील वाचा