Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड तब्बल ३९ महिने तुरुंगवास भोगलेल्या ओशोच्या शिष्येचा प्रियांका अन् आलियाला ‘हा’ सल्ला

तब्बल ३९ महिने तुरुंगवास भोगलेल्या ओशोच्या शिष्येचा प्रियांका अन् आलियाला ‘हा’ सल्ला

ओशोला देव मानल्याबद्दल आणि त्याच्या हत्येच्या कटात दोषी आढळल्याने ३९ महिने तुरुंगात असलेल्या मां आनंद शीला यांनी प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टला एक सल्ला दिला आहे. खरं तर असे सांगितले जात आहे की, मां आनंद शीला यांच्या दोन बायोपिक्स बनवल्या जात आहेत. त्यापैकी एकामध्ये मां आनंद शीला यांची भूमिका प्रियांका चोप्रा आणि दुसऱ्या चित्रपटात आलिया भट्ट भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. असेही म्हटले जात आहे की, मां आनंद शीला उर्फ ​​शीला बिर्नस्टील यांच्या चरित्रावर एक चित्रपट बनवला जात आहे आणि दुसरा शो आहे. प्रियांका चोप्रा या चित्रपटात तिचे पात्र साकारणार आहे आणि शोमध्ये आलिया भट्ट ऑन स्क्रीन मां आनंद शीला म्हणून दिसणार आहे.

मां आनंद शीला या नावाने प्रसिद्ध असलेल्या शीला बिर्नस्टील यांनी अलीकडेच प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टबद्दल स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले आहे. त्या एका मुलाखतीत म्हणाल्या की, “कधीकधी माझ्यावर बायोपिक बनवले जात आहेत, या बातमीवर मी हसते. जर बायोपिक बनवला गेला, तर आलिया आणि प्रियांकाला माझ्या व्यक्तीरेखेत खोलवर जावे लागेल. त्यांना घोटाळ्यांपासून दूर राहावे लागेल आणि आतून माझे पात्र शोधावे लागेल. मला माहित नाही की, ते हे करू शकतील का?” (The actress will be working on a biopic of Anand Sheela, who was found guilty of plotting to assassinate Osho)

काही वर्षांपूर्वी मां आनंद शीला यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राला बेकायदेशीरपणे मोठ्या पडद्यावर आपले जीवन आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती. शीला म्हणाल्या की, “मी प्रियांकाला सांगितले की मी तिला चित्रपट करण्याची परवानगी देत ​​नाही. कारण मी तिला निवडले नाही.” त्यांचे असे मत होते की, “आम्ही स्वित्झर्लंडमध्ये कायदेशीर नोटिसा खूप सहज पाठवतो. मी प्रियांकाला एक ईमेल पाठवला होता, जो तेथे कायदेशिररीत्या स्वीकारला गेला आहे.”

मां आनंद शीला म्हणाल्या होत्या की, “त्यांना प्रियांका चोप्रापेक्षा आलिया भट्ट जास्त आवडते.” त्या पुढे म्हणाल्या की, “मी एक चित्रपट पाहिला, जो माझी बहीण पाहत होती. हा चित्रपट पाहताना मला वाटले की, मी लहान असताना मी अगदी आलियासारखीच दिसत होते. मी माझ्या बहिणीलाही विचारले की, मी लहान असताना आलियासारखी दिसते होते का? तिने ‘हो’ असेही म्हटले.”

शीला आलियाबद्दल म्हणाल्या की, “मला वाटते की तिच्यामध्ये माझ्यासारखी हिम्मत आहे. ही अशी हिंमत आहे, जी कॉस्मेटिक नाही, पण ती खरी आहे.” मां आनंद शीला ओशोच्या मुख्य सहाय्यक होत्या. त्या त्यांच्या सर्वात जवळच्या शिष्या होत्या, ज्या अमेरिकेच्या ओरेगॉनमधील रजनीशपुरम आश्रम चालवतात. नंतर त्यांना ओशोच्या हत्येचा कट रचल्याबद्दल २० वर्षांची शिक्षा झाली, ज्यामध्ये त्यांनी फक्त ३९ महिने तुरुंगात घालवले. अलीकडे, नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘वाईल्ड वाईल्ड कंट्री’ या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून शीला पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात ओशोच्या आयुष्यातील मां आनंद शीलाची भूमिका आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

-तब्बल ३६ वर्षांपूर्वी ‘या’ जाहिरातीत दिसला होता ‘भाईजान’; हँडसम लूक पाहून चाहते नव्याने पडतायेत प्रेमात

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

हे देखील वाचा