Wednesday, June 26, 2024

‘या’ कारणावरून झाला होता शाहरुख अन् सलमानमध्ये वाद, कॅटच्या वाढदिवशी हाणामारीपर्यंत पोहचली गोष्ट

बॉलिवूडमध्ये मैत्री आणि भांडणे होणे सामान्य मानले जाते. अनेकवेळा आपण कलाकारांमध्ये झालेल्या भांडणांबद्दल ऐकत असतो. तसेच कालांतराने ते विसरूनही जातो. पण बॉलिवूडच्या या जगात असा एक वाद झाला होता, जो त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडावर असायचा. हा वाद झाला होता, बॉलिवूडच्या खान मंडळींमध्ये. होय, आम्ही बोलत आहोत सलमान खान आणि शाहरुख खानबद्दल. ही गोष्ट २००८ सालची आहे. असे म्हटले जाते की, त्यावेळी या दोघांमधील वाद इतका वाढला की, हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला होता. त्यांचा हा वाद माध्यमांमध्ये चांगलाच गाजला होता. तसेच, या वादाचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उस्तुक होते.

सलमान खानने ऐश्वर्या रायला चित्रपटातून काढून टाकले
सलमानने २००८ मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायला ‘चलते-चलते’ या चित्रपटातून काढून टाकले होते. सलमानने शूटिंगच्या सेटवर ऐश्वर्यासोबत वाद घातला होता. त्यानंतर त्याने ऐश्वर्याला या चित्रपटातून काढून टाकले. त्यावेळी शाहरूख देखील त्या चित्रपटात होता आणि त्याच्याविरुद्ध ऐश्वर्या होती. सलमान आणि शाहरुख या दोघांमधील दुश्मनीला इथूनच सुरुवात झाली. २००८ मध्ये अभिनेत्री कॅटरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सलमान शाहरुखच्या भांडणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (the argument between shah rukh and salman at katrinas birthday party reached directly)

कॅटरिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान आणि शाहरुखमध्ये झाला होता वाद
शाहरूख २००८ मध्ये त्याची पत्नी गौरी खानसोबत कॅटरिनाच्या वाढदिसानिमित्त ठेवलेल्या पार्टीत पोहचला होता. सलमानदेखील या पार्टीमध्ये उपस्थित होता. पार्टीत सलमानने शाहरूखला श्रीमती खन्नामध्ये कॅमिओ न केल्याबद्दल टोमणा मारला. या प्रकरणावरून दोघांमधील वाद इतका वाढला की, त्या दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. कॅटरिना आणि गौरीनेच शाहरुख आणि सलमानमधील वाद थांबवला.

सलमानसोबतच्या वादामुळे शाहरुखला लाज वाटते
शाहरूख १० वर्षांनंतर सलमानसोबत या वादाबद्दल बोलला. २०१८ मध्ये एका मुलाखतीत शाहरुख खानने सांगितले होते की, “सलमानसोबत कामावरुन वाद झाला नव्हता. तर, काही वैयक्तिक गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला होता.” शाहरुखने सांगितले होते की, त्याने हा वाद त्याच्या मुलांना देखील वेगळ्या प्रकारे समजावून सांगितला होता. त्याचबरोबर सलमानसोबतच्या या वादाबद्दल त्याला खूप लाज वाटते, असे देखील शाहरुख म्हटला होता.

कित्येक वर्षानंतर शाहरुख खान या वादाबद्दल बोलला
शाहरुख खानने असेही म्हटले होते की, “त्याच्या मुलांनी वर्तमानपत्र वाचले नाही आणि त्यांना त्याबद्दल जास्त माहितीही नव्हती.” याबद्दल तो खूप समाधानी होता. सलमानशी झालेल्या भांडणावर शाहरुख म्हणाला की, “खरं सांगायचं झालं, तर त्या दिवशी मी जाणार होतो, मी तिथे कोणताही वाद करण्यासाठी गेलो नव्हतो.”

“मी थकलो होतो आणि वाद झाला. जो कोणी या वादात आला त्याच्यासाठी मला खूप वाईट वाटले. माझ्यात आणि सलमानमध्ये कोणतीही चर्चा होत नसल्याने मी नाराज नाही. आम्ही एकमेकांपासून खूप वेगळे आहोत,” असेही तो म्हणाला होता.

सन २०१३ मध्ये सलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण संपले. बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये दोन्ही सुपरस्टार एकत्र आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत

निर्मात्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप; तर पत्रिका वाटप होऊनही ‘या’ कारणामुळे मोडले होते शिल्पाचे लग्न

हे देखील वाचा