झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे. येत्या आठवड्यात या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार आहे. यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम गेल्या 9 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, निलेश साबळे असे अनेक कलाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत.
सुरुवातीला या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसाद मिळाला होता. पण गेल्या काही वर्षांत या कार्यक्रमाची लोकप्रियता कमी झाली होती. त्यामुळे वाहिनीने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण येत्या आठवड्यात होणार आहे. या भागात कार्यक्रमातील सर्व कलाकार उपस्थित राहणार आहेत.
अभिनेते निलेश साबळे म्हणाले, “‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कार्यक्रमाने मला आणि माझ्या टीमला खूप काही दिले आहे. हा कार्यक्रम बंद होतोय याचा मला खूप वाईट वाटतो. पण वाहिनीच्या निर्णयाचं मी आदर करतो.” ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या बंद होण्याने मराठी प्रेक्षकांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमावर प्रेम व्यक्त केले आहे.
2014साली ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सुरू झाला होता. ‘लयभारी’ या चित्रपटाच्या निमित्ताने या कार्यक्रमातील कलाकारांची भट्टी जमली होती. तेव्हापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. यादरम्यान अनेक पर्व आणि विविध उपक्रम राबवले गेले. ‘होऊ दे व्हायरल’, ‘सेलिब्रिटी पॅटर्न’, ‘लहान तोंडी मोठा घास’, अशा अनोख्या ढंगाने प्रेक्षकांना पुन्हा कार्यक्रमाकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला गेला. पण याला काही यश आले नाही. (The audience will bid adieu to the program ‘Chala Hawa Yeu Dya’ which made Maharashtra laugh)
आधिक वाचा-
–ऍटलीने केले दीपिकाच्या अभिनयाचे कौतुक; म्हणाला, ‘ती संवादांपेक्षा डोळ्यांनी जास्त बोलते’
–केवळ चार वर्षातच तुटले अदिती राव हैदरीचे लग्न, जाणून घ्या तिचे लग्न ते घटस्फोटाची कहाणी