Saturday, June 29, 2024

काळजाला चटका लावणारी बातमी! राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे निधन, प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली माहिती

बॉलिवूडमधील दिग्गज एडिटर वामन भोसले यांचे सोमवारी (26 एप्रिल) मुंबईमध्ये पहाटे 4 वाजता निधन झाले. आजारपणाने त्यांचे हे निधन झाले आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मधुमेहाचा देखील त्रास असल्याचेही समजते. तसेच मागील काही दिवसांपासून त्यांची स्मरण शक्ती देखील कमी झाली होती. वामन भोसले हे चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेले एडिटर होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचे मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी दिली आहे.

सुभाष घई यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून ट्वीट केले. वामन भोसले यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना करत त्यांनी ट्वीट केले आहे की,  “वामन भोसले सरांच्या आत्म्यास देव शांती देवो. माझा पहिला चित्रपट ‘कालीचरण’चे एडिटर ते पुढे ‘खलनायक’ पर्यंत सर्व चित्रपटाचे एडिटर शिक्षक होते. ज्यांनी मला ‘ताल’ या चित्रपटाच्या एडिटिंगसाठी प्रेरित केले. एक महान शिक्षक.”

सुभाष घई यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “एक मास्टर एडिटर ज्यांनी १९७० पासून ते १९९० पर्यंत ४०० पेक्षाही अधिक चित्रपट एडिट केले आहेत. २५ पेक्षा जास्त एडिटरला ट्रेन केले आहे. ज्यांनी अनेक कमर्शियल आणि नॅशनल अवॉर्ड जिंकले आहेत.”

वामन भोसले यांचा जन्म गोव्यामध्ये झाला होता. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गोव्या मध्येच पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी एडिटर ‘डी एन पाई’ यांच्या बॉम्बे टॉकीजमध्ये एडिटिंगचे ट्रेनिंग घेतले. त्यांनतर जवळपास १२ वर्ष फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये असिस्टंट एडिटर म्हणून काम केलं.

चित्रपटसृष्टीतील त्यांचा पहिला प्रोजेक्ट १९६७ मध्ये खोसला यांनी दिग्दर्शन केलेला ‘दो रास्ते’ हा चित्रपट होता. वामन भोसले यांनी ‘मेरा गाव, मेरा देश’, ‘दो रास्ते’, ‘इंकार’, ‘दोस्ताना’, ‘गुलाम’, ‘अग्निपथ’, ‘हीरो’, ‘कालीचरण’, ‘सौदागर’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. १९७८ मध्ये त्यांना बेस्ट एडिटिंगचा नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अवघ्या १५ दिवसांत कोरोनाने माझा जिवलग मित्र खाल्ला!’ प्रविण तरडेंची फेसबुकवर भावनिक पोस्ट

-मोठ्या संकटातून कटरीना आली बाहेर, मानले मदत करणाऱ्या ‘या’ लोकांचे आभार

-महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट पाहाता मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरु आहे ‘या’ दोन ठिकाणी

हे देखील वाचा