Tuesday, July 9, 2024

सुपरस्टार खेसारी लाल यादवने वातावरण बनवले भक्तीमय; ‘महाकाल की दिवानी’ गाणं यूट्यूबवर घालतंय धुमाकूळ

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवने श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच आपल्या हटके गाण्यांनी धुमाकूळ घालत आहे. इतकेच नव्हे, तर श्रावण सुरू होताच भोजपुरीतील सर्व गायकांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय करुन टाकले आहे. याचदरम्यान, आता खेसारीच्या ‘महाकाल की दिवानी’ या नवीन गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्यामध्ये अभिनेता त्याची संगिनीबद्दल बोलत आहे आणि डान्स करत आहे.

भोजपुरी गीत ‘महाकाल की दिवानी’ चा व्हिडिओ खेसारी म्युझिक वर्ल्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. हे गाणे शनिवारी (१४ ऑगस्ट) प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रदर्शित झाल्यापासून या व्हिडिओने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. (The Bhojpuri song ‘Mahakal Ki Diwani’ made a splash and got so many views)

या गाण्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. या गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला ५१ हजार लाईक्स मिळाले आहेत. हे गाणे खेसारी लाल यादवने गायले आहे, तर या गाण्याचे गीत प्रकाश परदेशीने लिहिले आहेत आणि संगीत आर्य शर्माने दिले आहे. यासह या गाण्याला गोल्डी बॉबीने कोरिओग्राफ केले आहे. या गाण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही स्वत:ला नाचण्यापासून रोखू शकत नाही.

यापूर्वी खेसारी लाल यादवने त्याच्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ‘गणपती बाप्पा गजबे रौर पप्पा’, ‘चाचा संगे चाची डोळे हे’, ‘हनुमान गेयर’, ‘बलम बैरागी’, ‘जगी जगी महादेव’ आणि ‘सावन में धली खांसी’ अशी गाणी गायली आहेत. त्याचबरोबर या गाण्यांच्या व्हिडिओने प्रदर्शित झाल्यानंतर खूप धुमाकूळ घातला आहे.

याव्यतिरिक्त खेसारी या दिवसांमध्ये हैदराबादमध्ये आहे. तेथे तो एका दाक्षिणात्य चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मात्र, तो दक्षिणेच्या किंवा भोजपुरीच्या कोणत्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे, याची अजूनही अधिकृत माहिती मिळाली नाही. समोर आलेल्या त्याच्या रागीट लूकमुळे लोकांनी तो दक्षिण चित्रपट करणार असल्याचा अंदाज बांधला आहे. मात्र, आता यात किती सत्य आहे, हे चित्रपटाचे पोस्टर समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

-‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

हे देखील वाचा