बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ या आठवड्यात खास पाहुणी म्हणून दिसणार आहे. कॅटरिना कैफ तिच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत शोमध्ये पोहोचली होती. यादरम्यान रणवीर कॅटरिनासोबत खूप मस्ती करताना दिसणार आहे. एवढेच नाही, तर दोघेही एकमेकांच्या गाण्यावर डान्स करणार आहेत. प्रोमो पाहून अंदाज बांधला जाऊ शकतो की, हा शो खूप धमाकेदार असणार आहे. हा प्रोमो पाहून चाहते अधिकच उत्सुक होत आहेत.
रणवीर सिंग कॅटरिनासोबत करत आहे डान्स
प्रोमोमध्ये पाहिले जाऊ शकते की, रोहित, कॅटरिना आणि रणवीरला सांगतो की, तुम्ही दोघेही येथे आहात. चला तर पाहू या दोघांपैकी कोण चांगला डान्सर आहे. यानंतर दोघेही एकमेकांच्या गाण्यांवर एकत्र डान्स करतात. कॅटरिना रणवीर सिंगच्या ‘ततड-ततड’ गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहे, तर रणवीर कॅटरिनाच्या ‘चिकनी चमेली’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी तिचे कौतुक केले.
या प्रोमोसोबतच्या कॅप्शनमध्ये “रणवीर आणि कॅटरिना आमने-सामने, हा डान्स कोण जिंकणार?” हा प्रोमो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्याचबरोबर हा एपिसोड पाहण्याची उत्सुकताही वाढली आहे. हा एपिसोड या वीकेंडला दाखवला जाईल.
रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत, तर रणवीर सिंग आणि अजय देवगण या चित्रपटात पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कॅटरिना फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटातही दिसणार आहे. दुसरीकडे, माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनावरील ‘८३,’ चित्रपटात रणवीर सिंग दिसणार आहे. कॅटरिना कैफ ‘टायगर ३’ चित्रपटात दिसणार आहे. ज्यात तिच्यासोबत सलमान खान दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो
-‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’ करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण
-शाहिद कपूर आणि अमृता रावच्या सुपरहिट ‘इश्क विश्क’ चित्रपटाचा येणार सिक्वल










