Monday, July 1, 2024

‘या’ अभिनेत्रींनी बॉलिवूडमधील बाप-लेकासोबत केलाय रोमान्स, धकधक गर्लचाही आहे यादीत समावेश

हिंदी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या चिरतरुण सौंदर्याने अनेक दशके चित्रपटक्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. या अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याने आणि अदांनी सिनेसृष्टीत दोनदोन पिढ्या आपल्या अभिनयाच्या तालावर नाचवल्या आहेत. म्हणूनच सिनेसृष्टीत आजही या अभिनेत्रींच्या अभिनयाची, सौंदर्याची त्यांनी काम केलेल्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होताना दिसत असते.

सिनेसृष्टीत आपल्या कामाने आणि अभिनयाने सर्वांना थक्क करणाऱ्या अनेक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळतात. यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असतात त्या ९० च्या दशकातील अभिनेत्री. कारण आजच्या रोज नवीन येणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ही या जुन्या अभिनेत्रींनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या ९० च्या दशकातील अभिनेत्रींच्या कसदार अभिनयापुढे त्याकाळातील दिग्गज अभिनेते ही फिके पडल होते. त्यामुळेच या अभिनेत्रींनी त्या काळात दोन पिढ्यासोबत म्हणजे बाप आणि मुलासोबतही चित्रपटात रोमान्स केला आहे. कोण आहेत या अभिनेत्री, चला जाणून घेऊ.

माधुरी दिक्षीत – माधुरी दीक्षित ही ९० च्या दशकातील अशी अभिनेत्री होती जी कधीही कोणताही अभिनय करण्यास मागे सरली नाही. तिच्या अभिनयाच्या प्रवासात माधुरीने खन्ना कुटुंबातील पिता आणि पुत्रासोबत रोमान्स केला. ‘दयावान’मधला तिचा विनोद खन्नासोबतचा इंटिमेट सीन कोणीही विसरू शकणार नाही . त्यानंतर माधुरीने त्यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत ‘मोहब्बत’ चित्रपटात रोमान्स केला. पण आजही माधुरी आणि विनोद खन्नाच्या ‘दयावान’ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळते.

हेमा मालिनी – हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्री हेमा मालिनीच्या सौंदर्याने जग वेडे झाले होते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने थक्क करणाऱ्या हेमा मालिनी यांनी 1968 साली प्रदर्शित झालेल्या ‘सपनों के सौदागर’ या चित्रपटात शोमन राज कपूरसोबत काम केले.

डिंपल कपाडिया – अभिनेत्री डिंपल कपाडियाने अभिनेता धर्मेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल या दोघांसोबत मोठ्या पडद्यावर काम केले. 1984 मध्ये त्यांनी सनी देओलसोबत ‘मंझिल’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी धर्मेंद्रसोबत ‘मस्त कलंदर’ आणि ‘दुश्मन देवता’ या चित्रपटात काम केले. एवढेच नाही तर त्यांनी ‘दुष्मन देवता’ या चित्रपटात धर्मेंद्रसोबत एक किसिंग सीनही केला होता.

अमृता सिंग – 90 च्या दशकातील यशस्वी अभिनेत्री अमृता सिंगने चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. अमृताने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. अमृता सिंगनेही खऱ्या आयुष्यात पिता-पुत्र धर्मेंद्र आणि सनी देओलसोबत ऑनस्क्रीन रोमान्स केला. अमृताने ‘बेताब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये ती सनी देओलसोबत झळकली होती. यानंतर अभिनेत्रीने तिचे वडील धर्मेंद्र यांच्यासोबत ‘सत्य की शक्ती’ या चित्रपटात पत्नीच्या भूमिकेत काम केले.

श्रीदेवी – बॉलीवूडची पहिली सुपरस्टार श्रीदेवी आता या जगात नसेल, पण तिच्या अप्रतिम चित्रपटांनी लोकांची नेहमीच मने जिंकली आहेत. श्रीदेवीने धर्मेंद्रसोबत ‘वतन के रखवाले’, ‘फरिश्ते’, ‘नाकाबंदी’ आणि ‘सुलतनत’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. श्रीदेवीने ‘निगाहैं’ चित्रपटात सनी देओलसोबतही काम केले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा