Wednesday, June 26, 2024

‘फुकरे 3’ची शाहरुखच्या ‘जवान’ला जबरदस्त टक्कर; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांची रांग लागली आहे. कंगना राणौतच्या ‘चंद्रमुखी 2‘पासून ते अक्षय कुमारच्या ‘मिशन रानीगंज‘पर्यंत सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. कॉमेडी ड्रामा फिल्म ‘फुकरे 3‘ रिलीज होऊन 7 दिवस उलटून गेली आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला असून चाहते त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘फुकरे 3 ‘ हा 2013 मध्ये आलेल्या कॉमेडी ड्रामा फिल्म ‘फुकरे’चा सिक्वेल आहे. याआधी फुकरे 3 चा दुसरा भाग हिट झाला आहे.

फुकरे 3‘ (fukrey 3) गेल्या महिन्यात 28 सप्टेंबरला रिलीज झाला होता. या चित्रपटाने सहाव्या दिवशी 4.11 कोटींची कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, ‘फुकरे 3 ‘ सातव्या दिवशी 4.00 कोटी कमाई केली आहे. तर आठव्या दिवशी या चित्रपटाने 3.50 कोटी कमावले आहेत.

रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी आणि मनजोत सिंग यांचा चित्रपट ‘फुकरे 3’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने एका आठवड्यात 60 कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने 9व्या दिवशी फारशी कमाई केली नाही. पण त्याची एकूण कामगिरी जबरदस्त आहे. चित्रपटाने शुक्रवारी 2.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 68.32 कोटी झाले आहे.

फुकरे 3 चित्रपटाचे बजेट जवळपास 40 कोटी आहे. चित्रपटाच्या खर्चाने पाचव्या दिवशी 50 कोटींचा टप्पा ओलांडला. फुकरे 3च्या कमाईचा वेग पाहता, काही दिवसात तो 100 कोटींचा टप्पा पार करेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जर आपण फुकरे 3च्या शुक्रवारच्या कलेक्शनची ‘जवान’ च्या कलेक्शनशी तुलना केली तर शाहरुखच्या चित्रपटाने 1.86 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने 87 कोटींची कमाई केली आहे. सोमवारपर्यंत जगभरात कोणाची कमाई १०० कोटींचा टप्पा ओलांडू शकते? हे पाहण महत्वाच ठरणार आहे. (The comedy drama film Fukrey 3 has earned tremendous money at the box office)

आधिक वाचा-
केवळ एक कविता ऐकून रेणुका शहाणे पडली होती प्रेमात, जाणून घेऊया तिच्या प्रेमाचा प्रवास
हेमलचा झक्कास लूक, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

हे देखील वाचा