विवेक अग्निहोत्री हे प्रसिद्ध भारतीय निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. २००५ मध्ये क्राइम थ्रिलर ‘चॉकलेट’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन करिअरला सुरुवात करणाऱ्या विवेकने अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अलीकडेच त्याने त्याच्या एक्स अकाउंटवर एक मनोरंजक खुलासा केला आहे. त्याच्या मॅनेजरमुळे त्याने एका मोठ्या अभिनेत्याला आपल्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्याचे दिग्दर्शकाने म्हटले आहे.
विवेक अग्निहोत्रीने एक्स अकाउंटवर सांगितले की, अभिनेत्याचा मॅनेजर खूप गर्विष्ठ होता आणि त्याचे वर्तन दिग्दर्शकाशी चांगले नव्हते. यामुळे त्याने या अभिनेत्याला चित्रपटातून वगळण्याचा निर्णय घेतला. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या पोस्टला उत्तर देताना, दिग्दर्शकाने लिहिले, “मला गेल्या आठवड्यात एका मुख्य अभिनेत्याला काढून टाकावे लागले कारण त्याचा व्यवस्थापक खूप गर्विष्ठ होता. तो असे वागत होता की त्याला असे करण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे.” एका मोठ्या सेलेब्सच्या स्टार किड टॅलेंट एजन्सीचा कर्मचारी आहे या मध्यस्थांनी करियर बनवण्यापेक्षा जास्त बरबाद केले आहे.
विवेकने त्याच्या पोस्टमध्ये अभिनेत्याची ओळख उघड केलेली नाही. कास्टिंग डायरेक्टरने एक्स हँडलवर एक ट्विट केल्यावर ही घटना उघडकीस आली. आपल्या ट्विटमध्ये मुकेशने एका अभिनेत्याच्या व्यवस्थापनात अनेक लोकांच्या सहभागावर एक व्यंग्यात्मक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “चित्रपट उद्योगाची सद्यस्थिती: एक अभिनेता, २०० कास्टिंग डायरेक्टर आणि १५,६८० व्यवस्थापक.” त्यांच्या या पोस्टवरच विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांचे मत व्यक्त केले.
विवेक अग्निहोत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ते सध्या ‘दिल्ली फाइल्स’मध्ये व्यस्त आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी त्यांच्या X अकाउंटवर याबाबत माहिती शेअर केली होती. दिल्ली फाइल्स हा चित्रपट यावर्षीच्या वेळापत्रकानुसार फ्लोरवर जाईल असे त्यांनी सांगितले होते. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये मोठे स्टार्स नसले तरी चित्रपटाचा आशय हेच त्याचे बलस्थान असेल. त्यांनी सांगितले की दिल्ली फाइल्स हा त्यांच्या फाइल्स सीरिजचा शेवटचा भाग असेल, ज्या अंतर्गत ‘द ताश्कंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ देखील रिलीज करण्यात आल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बॉलीवूडची ही लोकं आहेत एकमेकांचे चांगले मित्र; वर्षानुवर्षे टिकली आहे मैत्री…










