Saturday, March 14, 2026
Home बॉलीवूड निर्माते नाही तर क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं धुरंदरच्या दिग्दर्शकाच, भ्रष्टाचारामुळे करियरला लागला होता ब्रेक

निर्माते नाही तर क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं धुरंदरच्या दिग्दर्शकाच, भ्रष्टाचारामुळे करियरला लागला होता ब्रेक

धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे. तर याचा दुसरा भाग ही लवकरच प्रदर्शित होत आहे. तर या चित्रपटाला रिलीज पूर्विच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कारण ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई झाली आहे. तर याचे दिग्दर्शक आदित्य धर हे आहे. आदित्य यांनी उरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम ठरले. धुरंदर प्रदर्शित झाल्यानंतर आदित्य धर यांचे अनेक लोकांनी कौतुक ही केले होते.

आदित्य धर (dhar)यांच्या बाबत एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे, की चित्रपट निर्माते होण्यापूर्वी आदित्य धरने 19 वर्षांखालील क्रिकेट देखील खेळले होते. त्याने एक उत्तम क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु भ्रष्टाचार आणि इतर परिस्थितींमुळे त्याचे स्वप्न चकनाचूर झाले. आणि नंतर त्यांनी चित्रपट निर्मितीमध्ये करिअर केले. आदित्य धरचे मार्गदर्शक असलेले दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी अलिकडच्या मुलाखतीत हे उघड केले होते.

अलीकडेच, प्रियदर्शनने एका मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने आदित्य धरशी असलेली मैत्री शेअर केली. आदित्यने त्याच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. प्रियदर्शन स्पष्ट करतात, “आदित्य हा एक हुशार कलाकार आहे. त्याने आमच्यासोबत लेखकांच्या टीम म्हणून काम केले आहे. त्याचे भाषेवरही चांगले प्रभुत्व आहे. तो एक अद्भुत माणूस देखील आहे. जेव्हा आम्ही एकत्र काम करत होतो, तेव्हा त्याने आम्हाला सांगितले की तो अंडर- 19 संघात क्रिकेट खेळायचा. पण भ्रष्टाचार आणि इतर विविध कारणांमुळे त्याची कारकीर्द जास्त काळ टिकली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

‘धुरंधर’ अभिनेत्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये केली एन्ट्री ,तर रेहमानचा ऑन-स्क्रीन मुलगा म्हणून मिळवली होती ओळख

 

हे देखील वाचा