Tuesday, July 9, 2024

रोजच्या धावपळीतून वेळ काढून बच्चन कुटुंबाने एकत्र साजरी केली दिवाळी, बिग बींनी दाखवली झलक

दिवाळीचा निमित्ताने सगळ्याच कलाकारांच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कलाकार त्याच्या कुटुंबासोबत हा सण साजरा करताना फोटो शेअर करत आहेत. बॉलिवूडमधील बच्चन कुटुंबाने देखील उत्साहाने हा सण साजरा केला आहे. खास गोष्ट म्हणजे रोजच्या धावपळीच्या वेळापत्रकातून वेळ काढून संपूर्ण बच्चन कुटुंबाने एकत्र सण साजरा केला आहे. याची झलक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर दाखवली आहे.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत एक फोटो शेअर करून सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्या दिल्या आहेत. या फोटोमध्ये त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन, मुलगी श्वेता बच्चन हे दिसत आहेत. सोबतच त्यांची नातवंड आराध्या, नव्या नवेली आणि अगस्त्य नंदा देखील दिसत आहे. सगळ्यांनी हॉलमध्ये सोफ्यावर बसून हा फॅमिली फोटो काढला आहे. या फोटोमध्ये सगळेच खूप खुश दिसत आहे. तसेच सगळेच पारंपारिक वेशात सुंदर दिसत आहेत. (Amitabh Bachchan share a bachchan family’s photo on social media and give best wishes of diwali)

दिवाळी बच्चन परिवाराने आनंदाने साजरी केली आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, “या शुभ प्रसंगी शुभेच्छा, तुमची दिवाळी आनंदाची जावो.” सोबत हात जोडण्याची ईमोजी पोस्ट केली आहे. त्यांचे चाहते या फोटोवर प्रेम दर्शवत आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोवर आठ लाखापेक्षाही अधिक लाईक्स आले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे. अजूनही ते जोमाने आणि ईर्षेने काम करतात. त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, तर अनेक चित्रपटाच्या शूटिंगला त्यांनी सुरुवात केली आहे. ते ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नागार्जुनसोबत दिसणार आहेत तसेच ते ‘मे डे’, ‘झुंड’ आणि ‘गुडबाय’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा