Monday, April 15, 2024

एक हजार कोटींची कमाई करु शकणाऱ्या सिनेमाची घोषणा, पोस्टर झालाय रिलीज

दक्षिणेतील सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि पृथ्वीराज सुकूमारन (Actor Prithviraj Sukumaran) नुकतेच प्रशांत नील दिग्दर्शित ‘सल्लार’ या चित्रपटात दिसले होते. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला. 22 डिसेंबरला प्रदर्शित झालेला हा सिनेमा अजूनही बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सल्लारच्या यशानंतर आता मात्र वेगळ्याच सिनेमाची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये सुरु आहे. ‘द गोट लाइफ’ (The Goat Life) असे या सिनेमाचे नाव आहे. सल्लारनंतर पृथ्वीराज ‘द गोट लाइफ’ (आदुजिवीतम) या चित्रपटात दिसणार आहे .

प्रभासने शेयर केला फस्ट लूक
प्रभासने बुधवारी त्याच्या सोशल मिडीयावर ‘द गोट लाइफ’चा फस्ट लूक शेयर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहीले , पृथ्वीराज सरांच्या चित्रपटाचा फस्ट लुक शेअर करताना आनंद होत आहे. #द गोट लाइफ- अ जर्नी ऑफ द इंडोमिटेबल हयुमन स्पिरीट. हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी चित्रपटगृहात पहायला मिळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. ब्लेसी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

अशी असेल द गोट लाइफची कथा
‘द गोट लाइफ’ (आदुजिवीतम) चित्रपट नजीब नावाच्या प्रवासी मजुरावर भाष्य करणार आहे. जो सौदी अरबमधील शेतात शेळ्या चारण्यासाठी मजबूर आहे. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक ब्लेसी(Director Blessy) यांनी कादंबरी वाचल्यावर एका वर्षानंतर या कथेवर काम सुरू केले होते. 2009 मध्ये त्यांनी कादंबरीच्या मुळ लेखकाशी काॅंट्रॅक्ट करून त्याचे पटकथेत रूपांतर केले. ज्यात पृथ्वीराज सुकूमारनला मुख्य भूमिकेत घेतलं आहे.

पृथ्वीराज सुकूमारनबद्दल थोडं-
पृथ्वीराज सुकूमारन यांनी मल्ल्याळम भाषेतील ‘नंदनम’ या चित्रपटातुन पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक मल्ल्याळम, तमिळ आणि तेलुगु सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे. आतापर्यंत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी 2 वेळा केरळ स्टेट फिल्म पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. अय्या व औरंगजेब या दोन सिनेमातही त्याने काम केले आहे. ऍक्टींग व्यतिरीक्त पृथ्वीराज दिग्दर्शन, पार्श्वगायन आणि ऍक्शन कोरीयोग्राफी देखील करतात.

हे देखील वाचा