Saturday, June 29, 2024

‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

सोनी टीव्हीवरील सिंगिग शो ‘इंडियन आयडल’ सीझन १२ नुकताच संपला आहे. परंतू, हा शो अजून देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. टेलिव्हिजन विश्वातील या शोने एक गोष्ट साध्य केली आहे. वृत्त असे आहे, की या शोच्या शेवटच्या एपिसोडने जबरदस्त टीआरपी मिळवून रेकॉर्ड बनवला आहे. ‘इंडियन आयडल १२’ च्या ग्रँड फिनाले एपिसोडला ३.७ चा टीआरपी मिळाला आहे. सोनू कक्करने तिच्या सोशल अकाऊंटवरून पार्टीचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.

अनेकदा वादात येऊनही शो टीआरपीमध्ये राहिला
‘इंडियन आयडल १२’ यावेळी अनेक प्रकारे प्रचंड खास ठरला आहे. एकदा नव्हे, तर अनेक वेळा वादात आल्यानंतर सोशल मीडियावर या शोवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. पण तरी देखील या शोचा टीआरपी तसाच राहिला. शोच्या समाप्तीबरोबरच, टीमने शो संबंधित ३.७ च्या टीआरपीचा आनंद जोरदार साजरा केला आहे. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

आदित्य नारायण आणि विशाल दादलानीने केक कापला
सोनू कक्करने पार्टी बॅशमधील काही फोटो शेअर केली आणि लिहिले की, “द ग्रेटेस्ट फिनालेला ३.७ चा टीआरपी मिळाला, मग पार्टी तर बनते ना.” त्याचवेळी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, होस्ट आदित्य नारायण, जज सोनू कक्कर, विशाल दादलानी हे केक कापताना आणि सेलिब्रेशनमध्ये दंग झालेले दिसत आहेत.

खास होता ग्रँड फिनाले
‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेबद्दल बोलायचे झाले, तर सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, अलका याज्ञिक, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, सुखविंदर सिंग आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली. विशेष म्हणजे उदित, अलका, सानू दा, अन्नू कपूर, सुखविंदर आणि इतरांनी या कार्यक्रमात काही अविस्मरणीय देखील गाणी गायली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पप्पी दे पप्पी दे पारुला’, म्हणत आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या स्मिताचा ग्लॅमरस लूक आला समोर

-शिवानी बावकर ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; एकता कपूर करणार निर्मिती

-‘…खोटं वाटतं, बरं तुझी शप्पथ’, प्राजक्ता माळीच्या सुंदर फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत

हे देखील वाचा