सध्या जगभरात रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने सगळीकडे प्रचंड दहशत पसरली आहे. दोन्ही देशांमधील या भीषण युद्धाने युक्रेनमधील अनेक सैनिकांचा सामान्य नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठीही खूप कसरत करावी लागली होती. याचदरम्यान आता अमेरिकेतील प्रसिद्ध निर्माते आणि पत्रकार ब्रेन्ट रेनौड (Brent Renaud) यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे.
याबाबत संपुर्ण माहिती अशी की, रविवारी (१३ मार्च) रशियन सेनेकडून इरपिन शहरावर बेछूट गोळीबार केला होता. ज्यामध्ये ब्रेन्ट रेनौड यांची गाडी निशाण्यावर आली होती. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या Juan Arrendondo हे सुद्धा गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ५० वर्षीय ब्रेन्ट रेनौड हे एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते, तसेच न्यूयॉर्क टाइम्समध्ये पत्रकारही होते. ते या युद्धामध्ये शरणागती पत्करलेल्यांवर एक रिपोर्टही तयार करत होते. मात्र याच युद्धात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान ब्रेन्ट यांना पत्रकारितेत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांच्या हत्यारांच्या तस्करीबद्दल केलेल्या शोधनिबंधाचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. ब्रेन्ट यांनी इराक आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर, आफ्रिकेतील उग्रवादावर अत्यंत परखड शब्दात आपले मत मांडले होते. त्यांच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा –