Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड मूर्ती लहान पण कीर्ती महान! उंचीने लहान असलेले ‘हे’ कलाकार करतात लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य

मूर्ती लहान पण कीर्ती महान! उंचीने लहान असलेले ‘हे’ कलाकार करतात लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य

सर्वांना वाटत असते आपण सुंदर दिसावे, आपले शरीर चांगले आणि देखणे रुप असावे. अनेकदा चाहते आपल्या आवडत्या कलाकारांसारखे  राहण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला माहीत आहे का. हे कलाकार पडद्यावर दिसतात तसे खरच असतात का?  चित्रपटात दिसणारे सगळेच कलाकार उंच नसतात, मात्र तरीही याचा त्यांच्या कारकिर्दीवर आणि अभिनयावर काहीत फरक पडत नाही. शिवाय त्या अभिनेत्यांच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील काडीमात्र फरक पडत नाही.

बऱ्याच वेळा चित्रपट फायटिंग दाखवली जाते. मुख्य नायक खलनायकाचा पराभव करतो आणि स्वत:ला सिद्ध करुन दाखवतो. एक नायक जबरदस्त फायटिंग करून शेकडो लोकांना एकटा मारताना दिसतो. पण प्रत्यक्षात हे कलाकार तुमच्या आणि आमच्या सारख्याच उंचीचे आहेत. या यादीत बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांचा समावेश होतो.

आमिर खान
बाॅलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणुन प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान. खऱ्या जीवनात त्याची खुप कमी उंची आहे. त्याची उंची फक्त ५ फूट ६ इंच इतकी आहे. मात्र, तो ‘धूम’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदूस्तान’ सारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त ऍक्शन करताना दिसतो.

शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख हा नेहमी एक साधा चेहरा आणि सामान्य उंचीसाठी ओळखला जातो. पण आजपर्यंत कोणीही त्याच्यासारखे यशाच्या शिखरावर पोहोचू शकले नाही. शारुखाने अनेक चित्रपटात मध्ये काम केले आहे. त्याच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर तो ५ फूट ८ इंच उंच आहे. रोमान्स किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुखचे या जगात करोडो फॉलोअर्स आहेत.

सलमान खान
चित्रपटांमध्ये कधी पालिसांची भूमिका साकारणारा सलमान खान अनेकदा ऍक्शन सीन करताना दिसतो. तर सलमान फक्त ५ फूट ८ इंच उंच आहे. पण सलमानची प्रतिमा मात्र दबंग आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयावर चाहते प्रचंड फिदा आहेत.

सैफ अली खान


छोटा नवाब म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे सैफ अली खान. सैफ अली खानला पाहून राजेशाहीचे शाहीरुप आठवत असते. पण त्याच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर तो देखील ५ फूट ७ इंच  इतकाच उंच आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये वतन वतन मेरे आबाद रहे तू’, गाण्यावर डान्स करत रिंकूने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; तुम्हीही पाहा

-स्वातंत्र्यदिनाचा उत्साह परदेशातही! अमेरिकन व्यक्तीने ‘चक दे इंडिया’ गाण्यावर केला भन्नाट डान्स

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

हे देखील वाचा