Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड रात्री झोपताना कोणीतरी दाबायचे हेमा मालिनींचा गळा? अभिनेत्रीने सांगितली ‘झपाटलेल्या’ थरारक घराची कहाणी

रात्री झोपताना कोणीतरी दाबायचे हेमा मालिनींचा गळा? अभिनेत्रीने सांगितली ‘झपाटलेल्या’ थरारक घराची कहाणी

बॉलिवूड ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी आपला अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अनेक दशके गाजवणाऱ्या हेमा शनिवारी (१६ ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करतात. तुम्हाला माहिती आहे का, की त्या जेव्हा चित्रपटसृष्टीत  नवीन होत्या, तेव्हा त्यांच्यासोबत एक घटना घडली होती. त्यांनी जेव्हा अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा त्या नकळत एका ‘झपाटलेल्या’ घरात राहायला गेल्या होत्या. या गोष्टीचा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर हेमा मुंबईत त्यांच्या पालकांसोबत राहत होत्या. जेव्हा त्या नवीन घरात शिफ्ट झाल्या, तेव्हा त्यांना रोज रात्री भयानक अनुभव आले. हेमा यांच्यासोबत काय होत होते हे त्यांच्या आईच्याही लक्षात आले होते. (the incident with actress hema malini revealed herself)

कोणीतरी झोपताना दाबायचे गळा
हेमा मालिनी यांनी २०१८ च्या एका मुलाखतीत सांगितले होते की, दररोज रात्री झोपताना कोणीतरी त्यांचा गळा दाबत असल्यासारखे वाटायचे. त्यावेळी त्या आईसोबत झोपायच्या. हेमा म्हणाल्या होत्या की, “मला अजूनही आठवते जेव्हा सुबोध मुखर्जीने मला एक अभिनेत्री म्हणून चित्रपटासाठी साईन केले होते, तेव्हा मी ‘सपनों के सौदागर’ या चित्रपटाची शूटिंग करत होते. त्यावेळी आम्ही अनंतस्वामींच्या घरातून बांद्रा येथील मानवेंद्र अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो होतो. तो एक छोटा फ्लॅट होता. भानू अथैया तिथे ड्रेस ट्रायलसाठी येत होती. शेवटी आम्ही जुहूच्या एका बंगल्यात शिफ्ट झालो. हे घर झपाटलेले निघाले.”

श्वास घेण्यास होत होता त्रास
हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, “दररोज रात्री कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे मला वाटत होते. मला श्वास घेण्यास त्रास होत होता. मी माझ्या आईबरोबर झोपायची आणि तेव्हा तिच्या ही लक्षात आले की, मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. जर ते एकदा किंवा दोनदा घडले असते, तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले असते, परंतु ते दररोज रात्री घडायचे. मग आम्ही आमचे स्वतःचे घर विकत घ्यायचे ठरवले.” अशाप्रकारे हेमा मालिनी यांनी या गोष्टीचा खुलासा केला.

हेमा मालिनी यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. त्यामध्ये ‘शोले’, ‘दो और दो पाँच’, ‘बागबान’, ‘क्रांती’, ‘दस नंबरी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही हेमा यांची लव्हस्टोरी, भर मंडपात जितेंद्र यांना सोडून धरला होता धर्मेंद्र यांचा हात

-चित्रपट निर्मात्यांच्या बायका उडवायच्या हेमा मालिनींच्या साडीची खिल्ली; म्हणायच्या, ‘ती पाहा…’

-‘जॉनी मेरा नाम’ चित्रपटाच्या वेळी देव आनंदसोबत काम करताना नर्व्हस झाल्या होत्या हेमा मालिनी; म्हणाल्या…

हे देखील वाचा