Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ बनला ‘जोरू का गुलाम!’, पत्नी सुनीताने पळवून पळवून करून घेतली तिची कामं

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ बनला ‘जोरू का गुलाम!’, पत्नी सुनीताने पळवून पळवून करून घेतली तिची कामं

‘हिरो नंबर वन’ म्हणून ओळखल्या जाणारा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांची जोडी बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. त्यांच्या प्रेमकथेचे बरेच किस्से आपण त्यांच्या तोंडून ऐकले आहेत. शिवाय त्यांचा सेन्स ऑफ ह्युमरही कमालीचा आहे. त्यामुळेच जेव्हाही ते दोघे एकत्र दिसतात, तेव्हा चाहत्यांमध्ये हास्याचा विस्फोट होतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्याचवेळी, एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून चाहते म्हणतायेत की, गोविंदा ‘हिरो नंबर वन’ नाही, तर ‘जोरू का गुलाम’ बनला आहे.

अलीकडेच गोविंदा आणि सुनीता आहुजा ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसले होते. आता या शोचा एक बॅकस्टेज व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात सुनीता आरशासमोर खुर्चीवर एकदम रुबाबात बसली आहे. इतकेच नव्हे, तर तो गोविंदाला आदेश देऊन काम देखील सांगत आहे. (the kapil sharma show govinda became joru ka ghulam wife sunita got her work done)

चाहत्यांमध्ये पिकला हशा
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुनीता आरामात बसून फळे खात आहे. पण गोविंदा तिच्या कपड्यांना इस्त्री करत आहे. यात तो धावपळ करत कधी हे काम करतोय, तर कधी ते काम करतोय. या गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘तुम तो धोखबाज हो’ हे गाणं वाजत आहे. हा सीन पाहून नेटकरीही चांगलेच लोटपोट झाले आहेत. चाहत्यांकडून या दोघांच्या केमिस्ट्रीचे कौतुक होत आहे. तर यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://www.instagram.com/tv/CT6lD9qsUPe/?utm_source=ig_web_copy_link

गोविंदा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. जरी गोविंदाचे चित्रपट काही काळ मोठ्या पडद्यावर खास कामगिरी करू शकले नाहीत, परंतु आजही त्याची फॅन फॉलोविंग बरीच आहे. गोविंदाने केवळ अभिनयानेच नव्हे, तर त्याच्या डान्सनेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत

-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

हे देखील वाचा