कपिल शर्माचा प्रसिद्ध ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दर आठवड्याला नवीन पाहुण्यांची एन्ट्री होते. तसेच त्यांच्याकडून अनेक न ऐकलेल्या गोष्टीही ऐकायला मिळतात. यावेळी इंडिया बेस्ट डान्सर मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस शोमध्ये पोहोचणार आहेत. शोचे अनेक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा सोनी टीव्हीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शोच्या या भागाची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये गीता कपूर आणि टेरेन्स लुईस मलायका अरोराच्या स्टाईलची कॉपी करताना दिसत आहेत. मलायका देखील त्यांच्या कृत्याचा पुरेपूर आनंद लुटत आहे.
प्रोमोमध्ये असे दिसत आहे की, कपिल शर्मानंतर गीता कपूर आणि टेरेन्स लुईसने देखील मलायकाची नक्कल करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. गीता कपूर म्हणते, “मलायका जेव्हाही घरातून किंवा जिमच्या बाहेर येते, तेव्हा ती अशीच चालते.” असे म्हणताच गीता कपूर अभिनेत्री मलायकाचे अनुकरण करत चालण्यास सुरुवात करते. गीता ऍक्शन करून मलायका कशी चालते ते दाखवते. ती म्हणते, “मलायका चप्पल घालून फिरायला जाते.” टेरेन्सही मलायकाचा पाय खेचतो आणि मलायका फोटोग्राफर्ससाठी कशी पोझ देते हे स्पष्ट करतो. यावर शोमध्ये उपस्थित प्रेक्षक आणि अर्चना पूरन सिंग जोरदार हसायला लागतात.
#TheKapilSharmaShow mein jab @terencehere #MaliakaArora aur @geetakapur aayenge, toh hoga dance pe dance! Aur ek dusre ki taang kheechne ka teeno nahin chhodenge koi chance! ???????? Dekhiye #TheKapilSharmaShow, iss Shani-Ravi 9:30 baje, sirf Sony par. pic.twitter.com/zgV2F7FZKh
— sonytv (@SonyTV) September 29, 2021
कपिल शर्मा टेरेन्सला विचारतो की, “तुम्ही गीता, मलायका आणि नोरा यांच्यासोबत अनेक पर्व परीक्षण केलेत, कोणासोबत जास्त मजा येते?” गीता म्हणते की, “एपिसोडमधील सर्व स्पर्धक खूप आनंदी होते. कारण टेरेन्स त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता आणि अशा परिस्थितीत उपाय कोण काढेल.” यानंतर, कृष्णा जितेंद्रच्या गेटअपमध्ये स्टेजवर येतो आणि मलायकासोबत नागिन डान्स करतो. तो म्हणतो की, “आज डान्सर येथे आले आहेत आणि सर्व काही डान्समध्येच होईल.” यानंतर, प्रत्येकजण हसतो. यानंतर कृष्णा म्हणतो, “मैं झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए.”
इंडियाज बेस्ट डान्सरचे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भात मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस कपिलच्या शोमध्ये त्यांच्या प्रमोशनसाठी आले होते. मलायका अरोराबद्दल बोलायचं झालं, तर ती तिचे स्टायलिश फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत राहते. मलायका अरोराने तिच्या खास गाण्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिने ‘छैय्या छैय्या’, ‘अनारकली’ आणि ‘मुन्नी बदनाम’ सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण
-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद