Friday, November 22, 2024
Home अन्य कृष्णा अभिषेकने पुन्हा एकदा काढली मामा गोविंदाची आठवण! आलिया भट्टने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

कृष्णा अभिषेकने पुन्हा एकदा काढली मामा गोविंदाची आठवण! आलिया भट्टने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘द कपिल शर्मा शो’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ‘आरआरआर’ चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी पोहोचली होती. आलिया भट्ट (Alia Bhatt), एस.एस. राजामौली, ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांनी शोमध्ये खूप मजा केली. कॉमेडी शोमध्ये कृष्णा अभिषेकला (Krushna Abhishek) पुन्हा एकदा त्याचे मामा गोविंदाची (Govinda) आठवण झाली. सपनाच्या भूमिकेत कृष्णा अभिषेक दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत मस्ती करताना दिसला. ज्यावर कपिल शर्मा (kapil sharma) म्हणतो की, “कसं बोलतेय सपना…” कृष्णा याचे उत्तर मजेशीरपणे देतो आणि म्हणतो की, “ज्याबद्दल त्याचे मामा विचार करत नाहीत, तर हे लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील.”

कृष्णा अभिषेकने गोविंदा मामाची आठवण काढताच, ज्युनियर एनटीआर, आलिया आणि राम चरण मोठ्याने हसायला लागतात. ‘द कपिल शर्मा शो’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये खूप मजा झाली आहे.

आलिया तेलगूमध्ये कपिल शर्माला एक डायलॉग म्हणून दाखवते, ज्याचा अर्थ ‘तुम्हाला माझ्याकडून किस’ असा होतो. हे ऐकून कपिल पूर्णपणे हैराण झाला आहे. ज्यावर ज्युनियर आणि राम चरण मोठ्याने हसतात.

कपिल शर्मा शोमध्ये सतत अर्चना पूरण सिंगच्या खुर्चीबद्दल बोलत असतो. ताज्या एपिसोडमध्ये, ज्युनियर एनटीआर कपिलला म्हणतो की, “एक दिवस मी तुझ्या खुर्चीवर बसेन आणि तू त्या खुर्चीवर बसशील, अशी माझी इच्छा आहे.” यानंतर कपिल शर्मा अर्चनाबद्दल गमतीने म्हणतो की, “ती दाढी ठेवून एनटीआर होईल, फक्त हे लक्षात ठेवा.”

चाहते पाहत आहेत आलिया आणि रणबीरच्या लग्नाची वाट
आलियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर आलिया आणि रणबीर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा एकत्र सुट्टीवर जातात. या जोडप्याचे चाहते आता फक्त त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. रणबीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर कोव्हिड-१९ महामारी आली नसती, तर त्यांनी लग्न केले असते.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा