हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठे आणि मानाचे पुरस्कार म्हणून फिल्मफेयर पुरस्कारांना ओळखले जाते. दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी नुकतेच २०२३ सालातल्या फिल्मफेयर पुरस्कारांचा समारंभ मोठ्या जल्लोषात पार पडला. राजकुमार राव आणि आलिया भट्ट यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गंगुबाई काठियावाडी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह १० पुरस्कार मिळाले. तर हर्षवर्धन कुलकर्णीच्या ‘बधाई दो’ने क्रिटीक्स अवॉर्ड मध्ये सर्वाधिक सहा पुरस्कार पटकावले. इतरही काही सिनेमांना एक दोन पुरस्कार मिळाले, मात्र विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला फिल्मफेअरमध्ये एकही पुरस्कार देण्यात आला नाही. आता यावर अनुपम खेर यांनी त्यांची अप्रत्यक्षरीत्या पोस्ट तर प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार २०२३मध्ये सात कॅटेगरीमध्ये नामांकन देण्यात आले होते. मात्र सिनेमाला एकही पुरस्कार देण्यात आला नाही. त्यामुळे अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “इज्जत ही महाग गोष्ट आहे. त्यामुळे ती देण्याची अपेक्षा छोट्या लोकांकडून ठेवू नये,” असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाला बेस्ट फिल्म, बेस्ट स्क्रीनप्ले आणि बेस्ट डायरेक्टर अशा विभागांमध्ये नॉमिनेट केले होते. तर मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांना बेस्ट सपोर्टिंग एक्टर कैटेगरी मध्ये नामांकन देण्यात आले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-