सध्या देशभरात ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाने चित्रपटगृहात धुमाकूळ घातला आहे. १९९०च्या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्याय अत्याचारावर आधारित हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेने देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनाचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. काश्मिरी पंडितांच्या अन्यायावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीस आहेच, परंतु चित्रपटातील दमदार डायलॉगनेही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, कोणते आहेत ते प्रसिद्ध डायलॉग चला जाणून घेऊ.
‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), दर्शन कुमार (Darshan Kumar) अशा दिग्गज कलाकारांनी अभिनय केला आहे. या कलाकारांच्या अभिनयाचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. मात्र सगळ्यात जास्त चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. हे आहेत चित्रपटातील गाजलेले चार डायलॉग.
हेही वाचा –