Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

काश्मिर फाइल्स चित्रपटाने तापवलंय देशाचं राजकारण, ‘या’ राज्यांनी केली चित्रपट टॅक्स फ्री करण्याची तयारी

सध्या देशभरात सगळीकडे ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. प्रदर्शनापुर्वीपासून हा चित्रपट कायमच चर्चेत राहिला आहे. १९९० च्या काळात घडलेल्या काश्मिरी पंडितांच्या अन्यायाचे वास्तव दाखवणारा हा चित्रपट आहे, त्यामुळेच हा चित्रपट राजकीय मैदानातही सध्या चर्चेत आला आहे. अनेक राज्यात या चित्रपटाला जोरदार विरोध केला जात आहे, तर काही राज्यांनी या चित्रपटाला  करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे हा चित्रपट आता पून्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे पडसाद राजकीय मैदानातही पडणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

‘नेमकी काय आहे या चित्रपटाची कथा’
याबाबत संपुर्ण माहिती अशी की, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. या चित्रपटात ९०च्या दशकात झालेल्या काश्मिरी हिंदु पंडितांवर झालेले अत्याचार, हल्ले आणि त्यांना काश्मिरमधून करावे लागलेले पलायन यांचे भीषण वास्तव दाखवण्यात आले आहे. यावेळी काश्मिरी पंडितांना झालेल्या प्रचंड त्रासाची दाहकता आणि वास्तव या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तत्पुर्वी काश्मिरी पंडित आणि हे तत्कालीन गाजलेले प्रकरण देशाच्या राजकारणातही प्रचंड गदारोळ करणारे ठरले होते. या सगळ्या प्रकारामुळे देशातील तत्कालीन केंद्र सरकारवर हिंदु विरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

काश्मिर पंडित हे प्रकरण पहिल्यापासून राजकीय मैदानात चर्चेचा विषय ठरले होते. आता त्याच विषयावर चित्रपट तयार झाल्याने या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काही राज्यांतील सरकारांनी केला आहे. या चित्रपटावर काही राज्यांनी बंदी आणली आहे, तर काही राज्यांनी या चित्रपटावरील टॅक्स मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये हरियाणा आणि गुजरात राज्याचा समावेश आहे. मात्र या सगळ्या गोंधळावर प्रतिक्रिया देताना चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मात्र हा चित्रपट पहिल्यांदा जाणून घ्या, चित्रपटाची कथा समजून घ्या आणि मग प्रतिक्रिया द्या असे आवाहन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा