Monday, February 23, 2026
Home बॉलीवूड द केरळ स्टोरी 2: सुरांच्या ओघात विरहाची वेदना आणि प्रेमाची गोडी अनुभवायला लावणारं हे गाणं

द केरळ स्टोरी 2: सुरांच्या ओघात विरहाची वेदना आणि प्रेमाची गोडी अनुभवायला लावणारं हे गाणं

‘द केरळ स्टोरी 2 – गोज बियॉन्ड’ र्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यानंतर चित्रपटातील पहिले गाणे ‘साथी रे’ही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कामख्या नारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट तीन हिंदू मुलींची अस्वस्थ करणारी आणि वास्तववादी कहाणी मांडतो.

चित्रपटात उल्का गुप्ता,(Ulka Gupta) ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया या तीन प्रमुख भूमिका साकारत आहेत. प्रेम, विश्वास आणि नात्यांपासून सुरू झालेली त्यांची कहाणी पुढे हळूहळू अंधाराकडे वळते. तीन मुस्लिम तरुणांच्या प्रेमात पडल्यावर या मुलींच्या आयुष्यात मोठे बदल घडतात आणि पुढे ही कथा धर्मांतराशी संबंधित कटकारस्थानाची भयावह बाजू उघड करते. टीझरमध्येच या गंभीर विषयाची झलक दाखवण्यात आली आहे.

चित्रपटातील पहिले गाणे ‘साथी रे’ भावनिक आहे. हे गाणे प्रेमात पडलेल्या मुलीचे स्वप्न, तिचे भावविश्व, कोणासाठी तरी स्वतःची दुनिया सोडण्याची तयारी आणि शेवटी मिळणारा फसवणूक व वेदनेचा अनुभव प्रभावीपणे मांडते. गाण्यात तीन मेल लीड कलाकारांचीही ओळख करून देण्यात आली आहे.
उल्का गुप्ताच्या अपोजिट सुमित गहलावत, ऐश्वर्या ओझासोबत अर्जन औजला, तर अदिती भाटियासोबत युक्तम खोसला दिसणार आहेत.

‘साथी रे’ला विशाल मिश्रा यांचा सुमधुर आवाज लाभला असून, गाण्याचे बोल मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत. संगीतकार मन्नन शाह यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

‘द केरळ स्टोरी’ने देशभरात मोठी चर्चा आणि वाद निर्माण केले होते. त्याच पार्श्वभूमीवर हा सिक्वेल अधिक खोलात जाऊन वास्तव उलगडण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह असून, आशिन ए. शाह यांनी सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली सहनिर्मिती केली आहे. ‘द केरळ स्टोरी 2 – गोज बियॉन्ड’ हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हटके लुक; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा