Sunday, August 10, 2025
Home अन्य ‘द केरळ स्टोरी’च्या समर्थनार्थ स्मृती इराणी आल्या पुढे, चित्रपट पाहून विरोधकांवर साधला निशाणा

‘द केरळ स्टोरी’च्या समर्थनार्थ स्मृती इराणी आल्या पुढे, चित्रपट पाहून विरोधकांवर साधला निशाणा

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी‘ 5 मे राेजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. अशात आता ‘द केरळ स्टोरी’ रिलीज झाला असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर ‘द केरळ स्टोरी’वर देशातील अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटावरून अनेक प्रकारचे राजकारणही होत आहे. त्याचवेळी आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

खरे तर, स्मृती इराणीने नुकताच ‘द केरळ स्टोरी’ पाहिला आहे, त्यानंतर त्यांनी या चित्रपटाच्या चर्चेवर त्यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्या म्हणाल्या की, “जे राजकीय पक्ष या चित्रपटाला विरोध करत आहेत ते दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे आहेत. मी स्वतः एक आई असल्यामुळे हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते.”

‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री दिल्लीतील चाणक्यपुरी येथील चित्रपटगृहात पोहोचल्या होत्या. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या या चित्रपटावर त्यांची प्रतिक्रिया देताना दिसत आहे. या चित्रपटाला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे, तर दुसरीकडे अदा शर्मा स्टारर चित्रपटाला अनेक राज्यांमध्ये प्रचंड विरोध होत आहे. ‘द केरळ स्टोरी’वर तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

मंडळी या सर्व वादांच्या दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे अभिनेत्री खूप चर्चेत आली आहे.(the kerala story union minister and tv actress smriti irani react after watching movie know here about her reaction )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्मृती इराणींनी विवाहितांना दिला मजेशीर सल्ला, शेअर केला दयाबेनचा ‘ताे’ व्हिडिओ, चाहते हसून हसून लाेटपाेट
राखी सावंत पुन्हा संकटात, ड्रामा क्वीनला पुन्हा माराव्या लागणार कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या चक्रा

हे देखील वाचा